सर्वसाधारण आरक्षण पडल्यास दाभोळे जि.प. निवडणूक श्रीधर कबनुरकर लढवणार.

Spread the love

सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल कार्यकर्त्याला नेतृत्व देण्याची जनतेतूनच मागणी.

जनशक्तीचा दबाव न्यूज | साखरपा | फेब्रुवारी ०३, २०२३.

दाभोळे जिल्हा परिषद गटातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य तसेच काही प्रतिष्ठित नागरिक यांची एकत्र बैठक साखरपा येथील कबनुरकर सभागृहात पार पडली. सदर बैठकीत आगामी काळात पक्ष वाढीसाठी चर्चा व विविध उपाययोजना याबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली.

भाजपा संगमेश्वर, संघटन सरचिटणीस अमित केतकर यांनी आगामी जि.प.-पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्वसाधारण आरक्षण पडले तर भाजपचे अधिकृत उमेदवार सामाजिक कार्यकर्ते श्री. श्रीधर कबनुरकर असावेत असा प्रस्ताव उपस्थित मंडळींसमोर मांडला. सर्वांनीच या प्रस्तावाचे स्वागत करत एकमताने अनुमोदन दिले. श्री. कबनुरकर यांनीही कार्यकर्त्यांचा मान राखत ही आव्हानात्मक जबाबदारी स्विकारण्यास निर्णायक सहमती दिली.

यावेळी बोलताना केतकर म्हणाले, “श्रीधरजी, उत्स्फूर्त कार्यकर्ते आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सामजिक क्षेत्र आणि भाजपा यात काम करत असताना त्यांनी आपले कार्यकर्तेपण चिरंतन जपले आहे. त्यांच्या निस्पृह कार्याचा गौरव करण्यासाठी आपण सर्व भाजपा कार्यकर्ते मा. तालुकाध्यक्ष, मा. जिल्हाध्यक्ष तसेच आपले नेते मा. ना. रविंद्र चव्हाण साहेब यांच्याकडे यावेळी आपली मागणी लावुन धरू. मला खात्री आहे, आपले श्रेष्ठी आपला आणि श्रीधरजींचा विचार साकल्याने करतील. अद्याप युतीबाबत कोणतीही चर्चा नाही. तथापि युती झाल्यास आपली ताकद वाढेल. ना. शिंदे साहेबांचे शिवसैनिक या अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाचे नेतृत्व स्वीकारतील. या सर्व काळात आपली जबाबदारी कैकपटीने वाढणार आहे. त्यामुळे उपस्थित कार्यकर्त्यांना ‘आता तयारीला लागा’ असा संदेश श्री. अमित केतकर यांनी दिला आहे.

कोण आहेत श्रीधर कबनुरकर?

श्री. श्रीधर कबनुरकर हे प्रथितयश व्यापारी असून कोंडगाव व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा व्यापारी संघटनेचे सचिव म्हणून आपली सेवा देत आहेत. भवानी शिक्षण संस्था, मिरज संचलित डी. के. इंग्लिश मिडीयम स्कूल, कोंडगाव-साखरपा या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे ते चेअरमन आहेत. दत्तसेवा पतसंस्थेमध्ये ते व्हाईस चेअरमन म्हणून कार्यरत आहेत. ‘पाणी’ क्षेत्रातील त्यांचे भरीव योगदान पाहून महाराष्ट्र शासनाने नुकतीच त्यांची ‘जलदुत’ म्हणून नेमणूक केली आहे. परिसरातील काजळी नदीच्या गाळ उसपा कार्यक्रमात त्यांची भूमिका मोलाची ठरली होती. असे ‘चतुरस्त्र’ आणि ‘अग्रणी’ व्यक्तिमत्त्व पंचायत समिती अथवा जिल्हा परिषदेत नेतृत्व करणार असेल तर काही काळ पक्षीय भूमिका बाजूला ठेऊन आम्ही श्रीधर कबनुरकर यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहू असा होरा जनतेतून ऐकायला मिळत आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page