आजचे राशीभविष्य : तुमच्या राशीनुसार कसा असेल वर्षाचा शेवटचा दिवस?, वाचा राशीभविष्य…

Spread the love

आज कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन राहील चांगलं, जोडीदाराची कोणाला मिळेल साथ, आजचं राशीभविष्य कसं असेल, जाणून घ्या ज्योतिषी सरिता शर्मा यांच्या आजच्या राशीभविष्यात.

▪️मेष (ARIES) : आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र भाग्यात आहे. आज आपणास रागावर ताबा ठेवावा लागेल. अन्यथा आपल्या कामात बिघाड आणि संबंधात कटुता निर्माण होईल. मानसिक बेचैनीमुळं आपलं कामात लक्ष लागणार नाही. प्रकृती नरमच राहील. एखाद्या मंगल प्रसंगी हजर राहण्याचे आमंत्रण मिळेल.

▪️वृषभ (TAURUS) : आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी आहे. शारीरिकदृष्टया अस्वस्थ असल्यानं कामात सफलता मिळण्यास उशीर होईल आणि त्यामुळं निराश व्हाल. आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका. योग्य आहार घ्या. आज कामाचा व्याप वाढेल. शिथिलता राहील. प्रवासात विघ्ने येतील. एखाद्या कामाच्या मागे लागून सुख शांती गमावून बसण्याची शक्यता आहे.

▪️मिथुन (GEMINI) : आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र सातव्या स्थानी असेल. आजचा दिवस आनंददायी आहे. शरीर, मन आनंदी राहील. कुटुंबीय आणि मित्र परिवार यांच्यासह एकाद्या पर्यटन स्थळाला भेट द्याल. स्वादिष्ट भोजन मिळेल. नव्या कपड्यांची खरेदी होईल. वाहनसौख्य मिळेल. आपल्या मान – सन्मानात आणि लोकप्रियतेत वाढ होईल.

▪️कर्क (CANCER) : आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र सहाव्या स्थानी असेल. आजचा दिवस व्यापार-व्यवसायात फायदा मिळवून देणारा आहे. सहकार्यांचं अपेक्षित सहकार्य मिळेल. आज आपल्या सहवासात कुटुंबियांचा वेळ खूप आनंदात जाईल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. शत्रूवर विजय मिळेल. चालू कामात यश मिळेल. खर्चाचे प्रमाण मात्र वाढेल.

▪️सिंह (LEO) : आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र पाचव्या स्थानी असेल. आजचा दिवस नवनिर्माण आणि कला यासाठी उत्तम आहे. विद्यार्थ्यांना सुद्धा अभ्यासात प्रअनुकूलता लाभेल. मित्राच्या गाठीभेटी होतील. प्रकृती उत्तम राहिली तरी सुद्धा रागावर नियंत्रण ठेवावं लागेल. त्यामुळं मानसिक स्वास्थ्य टिकेल.

▪️कन्या (VIRGO) : आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र चौथ्या स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. कशातही उत्साह वाटणार नाही. मन चिंतीत राहील. पत्नीबरोबर वाद किंवा मतभेद होतील. आईच्या तब्येतीची काळजी वाटेल. स्थावर संपत्तीच्या कामात सावध राहावं.

▪️तूळ (LIBRA) : आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र तिसऱ्या स्थानी असेल. आजचा दिवस आनंदात जाईल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. प्रत्येक कामात यश मिळेल. स्वकीय भेटतील. मन आनंदी राहील. एखाद्या प्रवासाने मनाला आनंद मिळेल. आपसातील संबंध सुधारतील.

▪️वृश्चिक (SCORPIO) : आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र दुसऱ्या स्थानी असेल. आज आपणास जर कौटुंबिक वातावरणात शांतता हवी असेल तर वाणीवर संयम ठेवावा लागेल. आपल्या बोलण्यानं एखाद्याचं मन दुखावले जाईल. आपल्या वागणुकीचा कोणास त्रास होऊ नये म्हणून म्हणून वर्तन सुद्धा संयमित ठेवा. नकारात्मक विचारांना थारा देऊ नका. स्वास्थ्य बिघडेल, मन उद्विग्न होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळा येईल.

▪️धनू (SAGITTARIUS) : आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज निर्धारित केलेली सर्व कार्ये पूर्ण होतील. आर्थिक लाभ होतील. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य आपणाला आनंदी ठेवेल. एखादा प्रवास संभवतो. आपली माणसे भेटल्याचा आनंद होईल. स्नेहीजनांकडील मांगलिक प्रसंगात सहभागी व्हाल. यश-कीर्ती वाढीस लागेल.

▪️मकर (CAPRICORN) : आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र बाराव्या स्थानी असेल. आज मन अस्वस्थ राहील. एखाद्या मांगलिक किंवा सामाजिक कार्यासाठी पैसा खर्च होईल. मित्रांशी मतभेद होतील. धनहानी आणि मानहानीची शक्यता आहे. आज एखाद्या गूढ विद्येकडं आपला कल होईल. कोर्ट- कचेरीच्या कामात अपयश येईल. वाणीवर ताबा ठेवावा लागेल.

▪️कुंभ (AQUARIUS) : आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र लाभात आहे. आज आपणांस मिळणार्‍या फायदयामुळं आपला आनंद द्विगुणित होईल. नव्या कार्यासाठी केलेला प्रारंभ कार्यसिद्धीच्या दृष्टीनं शुभ आहे. व्यापारी वर्गाला व्यापारात फायदा होईल. सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल. संततीबरोबर चांगले संबंध राहतील. प्राप्तीत वाढ होईल. एखाद्या प्रवासाचा बेत आखू शकाल.

▪️मीन (PISCES) : आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र दशम स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नोकरी-व्यवसायात यश मिळेल. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश झाल्यामुळं आपल्या मनाची प्रसन्नता वाढेल. व्यापारात जुनी येणी वसूल होतील. वडीलांनकडून लाभ होईल. कौटुंबिक आनंदामुळं आपण आनंदी राहाल.

🔸️एस्ट्रो सरिता शर्मा -9310820945
🔸️वैदिक, केपी, अंकज्योतिष, मोबाइल अंकज्योतिष, ,जैमिनी, नाडी, टैरो…

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page