आर्थिक :
तुम्हीही नजीकच्या भविष्यात एफडी करण्याच्या तयारीत आहात का ? मग तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर समोर आली आहे.
ती म्हणजे देशातील प्रायव्हेट सेक्टर मधील सर्वात मोठ्या बँकेने अर्थातच एचडीएफसी बँकेने एफडी व्याजदरात मोठी वाढ केली आहे.
अशातच आता HDFC बँकेने आपल्या एफडी व्याजदरात वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे एसबीआयचे एमडी अश्विनी कुमार तिवारी यांचा अंदाज खरा ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान HDFC बँकेने आजपासून फिक्स डिपॉझिटचे व्याजदर सुधारित केले आहेत. बँकेने नुकत्याच काही दिवसांपूर्वी दोन ते पाच कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीसाठी व्याजदर सुधारित केले होते.
यानंतर बँकेने आज अर्थातच 9 फेब्रुवारी 2024 पासून दोन कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीसाठीचे व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने एफडीच्या व्याजदरात 0.25 टक्के एवढी वाढ केली आहे.
ही वाढ काही ठराविक कालावधीच्या एफडी साठी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एचडीएफसी बँकेने 18 महिन्यांपासून ते 21 महिन्यांपर्यंतच्या एफडी साठीच्या व्याजदरात 0.25 टक्के एवढी वाढ केली आहे. आतापर्यंत या एफडीसाठी सर्वसामान्य नागरिकांना सात टक्के एवढे व्याज दिले जात होते.
तसेच ज्येष्ठ नागरिकांना 7.50% एवढे व्याजदर दिले जात होते. आता मात्र सर्वसामान्य गुंतवणूकदारांना या FD साठी 7.25% एवढे व्याजदर दिले जाणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना 7.75% एवढे व्याजदर मिळणार आहे.
आता एचडीएफसी बँकेकडून एफडी करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना 3 टक्क्यांपासून ते 7.25% पर्यंतचे व्याजदर पुरवले जाणार आहे.
दुसरीकडे ज्येष्ठ नागरिकांना 3.50% पासून ते 7.75 टक्क्यांपर्यंतचे व्याजदर दिले जाणार आहे. एचडीएफसी बँक सात दिवसांपासून ते दहा वर्षांच्या कालावधीची एफडी ऑफर करत आहे.
जाहिरात
जाहिरात