रत्नागिरी- 18 ते 20 नोव्हेंबर 2024 दरम्यान आर एन शेट्टी इनडोअर स्टेडियम, धारवाड, कर्नाटक येथे सुरु होणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रीय अस्मिता खेलो इंडिया खेलो तायक्वांदो लीग स्पर्धासाठी कु. त्रिशा साक्षी सचिन मयेकर हीची निवड झाली आहे. दिंडीगुल पोंडेचेरी येथे झालेल्या स्पर्धत त्रिशाने सुवर्ण पदक प्राप्त केले असल्यामुळे ती राष्ट्रीय फेरीत सहभागी होण्यास पात्र झाली आहे.
त्रिशाला मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक आंतर राष्ट्रीय खेळाडू, एशियन युनियन कोच, राष्ट्रीय पंच, महाराष्ट्र राज्य स्वयंमसिध्दा प्रशिक्षक श्री.प्रशांत मनोज मकवाना व महिला प्रमुख प्रशिक्षक सौ.आराध्या प्रशांत मकवाना यांचे मार्गदर्शन लाभत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गणराज क्लबने नेहमीच राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे क्रिडा शिक्षक श्री राकेश आबेंकर, रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. विजय शिंदे यांनी त्रिशाला शुभेच्छा दिल्या आहेत.
तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबईचे अध्यक्ष डॉ अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, कोषाध्यक्ष वेंकटेश कररा, उपाध्यक्ष निरज बोरसे, दुलीचंद मेश्राम, प्रवीण बोरसे, सहसचिव सुभाष पाटील, कार्यकारणी सदस्य अजित घार्गे, सतीश खेमस्कर, जिल्हा सघंटनेचे सचिव लक्ष्मण के, खजिनदार शंशाक घडशी तसेच गणराज क्लबचे पदाधिकारी अभिजित विलणकर, नुतन किर, रंजना मोडूंळा, साक्षी मयेकर, कनिष्का शेरे, यशंवत शेलार, पुजा कवितके, एस.आर.के चे प्रशिक्षक शाहरुख शेख, जयभैरीचे प्रशिक्षक मिलिंद भागवत पालकवर्ग आदींनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.