पुणे- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या डिजिटल मिडियाचे प्रदेश अध्यक्ष म्हणून सिध्दार्थ भोकरे यांची निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा सत्कार केला. तसेच निवडीचे पत्र देऊन उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी त्यांचा सत्कार केला.
यावेळी प्रदेश संघटक संजय भोकरे, प्रदेशाध्यक्ष किरण जोशी व विविध वृत्तपत्रांचे संपादक, पत्रकार उपस्थित होते. आगामी काळात डिजिटल मिडियामार्फत राज्यातील पत्रकारांसाठी विविध योजना राबवून जनतेला सर्वस्तरातील बातम्या अतिजलदगतीने देण्याचा मानस असल्याचे यावेळी सिध्दार्थ भोकरे यांनी सांगितले.