नेरळ गावाची एकविरा आई मानाची पालखी सोहळ्याचे थाटामाटात कार्ला गडावर प्रस्थान करून सोहळा संपन्न…

Spread the love

नेरळ- सुमित क्षीरसागर एकविरा आई नेरळ गाव व परिसराची मानाची पालखी सोहळ्याला सोमवार 15 जानेवारी संक्रातीच्या शुभमुहूर्तावर सुरुवात झाली.नेरळ हेटकरआळी गणेश मंदिर येथून या आधीशक्ती आईची पालखी कार्ला एकविरा गडाच्या दिशेने ढोल-ताशा,ब्रास बॅण्डच्या तालावर वाजत-गाजत-नाचत भक्तिभावाने प्रस्थान केलं.या पालखी सोहळ्याचे यंदाचे चवथे वर्ष आहे. नेरळ गावाची मानाची पालखी म्हणून एकविरा आई पालखी सोहळा प्रसिद्ध म्हणून ओळखली जाते.भक्तांना पावणारी,हाकेला धावणारी म्हणून तिची पंचक्रोशीत नाव आहे, या मानाची एकविरा आईची पालखी सोहळा हा दोन दिवस म्हणजेच संक्रातीच्या शुभमुहूर्तावर सुरू झाला असून तो आज मंगळावर 16 जानेवारीच्या दुसऱ्या दिवशी एकविरा गडावर ही पालखी पोहचेल,गडावर देखील विविध माध्यमातून उत्सव सोहळा हा उत्साहात साजरा केला जात असतो. नेरळ येथे पालखीचे विधिवत पूजन केल्यानंतर पालखी श्री गणेश मंदिरातून एकवीरा गडाकडे प्रस्थान करण्यात आली होती. या पालखीत हजारो तरुण मंडळी सहभागी झाली होती. महिला वर्गानी नऊवारी साडी,नाकात नथनी,हातात हिरवा चुडा चढवीत पारंपरिक वेशभूषा परिधान केलेलं या निमित्ताने दिसून आलं.आईची पालखी यावेळी खास सजवलेली पाहायला मिळाली,पालखीचा कळस म्हणून अयोध्यातील राम जन्म भूमी येथे साकारण्यात आलेले रामललाचे मंदिर याठिकाणी दाखवण्यात आलेले दिसून येत होते.तर पालखीचे भोई झालेल्या तरुणांच्या पायाचे दर्शन घेत येथील गावकरी महिला वर्गानी आईची आरतीची ओवाळणी करीत गाऱ्हाणं देखील घातलं.

रात्री मुक्काम करून घाटमार्गने एकवीरा देवीच्या पायध्याशी संध्याकाळी पोहोचली. गडावर चढून सायंकाळी ७ ची आरती करून गडाचा पायध्याशी मुक्कामी राहणार दुसऱ्या दिवशी स्नेहा भोजन करून संध्याकाळी पालखी नेरळ येथे आगमन करून जकात नाका नेरळ ते वरद विनायक मंदिर हेटकर आली गणपती मंदिर वाजत गाजत सोळा संपन्न होणार आहे.

पालखीत अकरा वर्षांचा विघ्नेश सुयॆकांत लोभी हा सुध्दा सहभागी जाला होता. या पालखी सोहळ्यात यावेळी विविध राजकीय पुढारी एकत्र आलेली होती .त्याच सोबत नेरळ ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच,सदस्य आणि ग्रामस्थ विश्वजीत नाथ भगवान म्हसकार रवींद्र मिसळ पवन डबरे रोहन मिसळ प्रथमेश घाटे रोशन लोभी पवन राणे कल्पेश गवळी यांसह आबालवृद्ध,अनेक मान्यवर सहभागी झाले होते. आपली संस्कृती, परंपरा पुढे नेण्याचे काम नेरळ मंडळ करत असून पंचक्रोशीतील तरुणांना एकत्र करीत आहेत,जाती पातीच्या पलीकडे जाऊन हे मंडळ गेल्या चार वर्षांपासून शहरात आईच्या रूपाने पालखीच्या स्वरूपात एक चळवळ उभी करू पाहत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page