कसबा येथे  धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य दिव्य स्मारक उभारू, औरंगजेबाची कबर उखडून काढणार –  पालकमंत्री नितेश राणे….

Spread the love

मकरंद सुर्वे/ संगमेश्वर- कसबा या ठिकाणी भव्य दिव्य स्मारक उभारू , संभाजी महाराज्यांच्यामुळे हिंदू नाव लावायला मिळत आहे. मी हिंदू म्हणून बोलायला आलो असून औरंगजेबाची कबर उखडून टाकू . एके दिवशी करेक्ट कार्यक्रम केला जाईल असे प्रतिपादन पालकमंत्री आणि रत्नागिरी जिल्हा संघटक नितेश राणे केले.

कसबा शास्त्रीपूल या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज धर्म रक्षण दिन समिती च्या वतीने संभाजी महाराज बलिदान दिन कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर आमदार प्रसाद लाड, आमदार शेखर निकम, माजी आमदार प्रमोद जठ्यार, रोहन बने, राजेंद्र महाडिक, सदानंद चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

https://x.com/NiteshNRane/status/1899380492757254188?t=S_uNR0T5NavUh_2xq4x8Fg&s=19

यावेळी बोलताना आमदार प्रमोद जठ्यार म्हणाले की ज्या ठिकाणी महाराज्यानी  लढाई केली  त्या ठिकाणी महाराजांचे भव्य दिव्य स्मारक व्हावे अशी इच्छा होती.  सर देसाई यांनी जागा द्यावी म्हणून प्रयत्न केले स्मारकाला स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाइस आहे नाव द्यावे अशी मागणी केली .11 मार्च स्मरण दिन असून तो दिवस कधीही विसरणार नाही. माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी गेल्या वर्षी या ठिकाणी कार्यक्रम झाला होता तेव्हा भव्य दिव्य स्मारक व्हावे अशी इच्छा होती.


आमदार शेखर निकम यांनी धर्मवीर छत्रपती शंभू राज्यांची आठवण कायम स्मरणात राहिले पाहिजे अशा प्रकारचे स्मारक झाले पाहिजे. स्मारक चांगल्या पद्धतीने तयार होईल अशा प्रकारे प्रयत्न करून सुरुवातीला पाच एकर नंतर पन्नास एकर जमिनीमध्ये इतिहास साक्ष होईल असे स्मारक उभारून तसेच कसबा ते शृंगारपूर हा रस्ता चांगल्या प्रकारे तयार करून इतर पुरातन वास्तू ही विकसित कराव्यात
यावेळी आमदार प्रसाद लाड यांनी महाराष्ट्र चळवळ उभी राहिलो. या ठिकाणी स्मारक तेवढेच उभारून चालणार नाही तर इतर व्यवस्थाही  केली पाहिजे. यावेळी बोलताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की औरंगजेबाची निशाणी नष्ट केली आहे. औरंगजेबाची कबर उखडून काढू सरकारने काढली नाही तर आम्ही काढू. कबर काढण्यासाठी लॉंग मार्च काढू.

आम्ही हिंदू म्हणून व्यासपीठावर आहोत. असे स्मारक बांधू की जगभरातील सर्व याठिकाणी नतमस्तक होऊन जातील. भव्य दिव्य आम्ही स्मारक उभे करू.  हिंदू नावे लागली आहेत ती धर्मवीर संभाजी महाराजांच्या मुळे लागली आहेत . औरंगजेबाची कबर काढण्यासाठी कोणत्या प्रकारची तारीख  अथवा वेळ घोषित केला जाणार नाही असे प्रतिपादन नितेश राणे यांनी केले.

बलिदान दिनानिमित्त धाडसी खेळांची प्रात्यक्षिके तसेच संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित पोवाडा सादर करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमोद अथटराव, अमित ठाकरे , सतीश पटेल, विनोद म्हस्के , स्वप्निल सुर्वे, मिथुन निकम अविनाश गुरव आदींनी प्रयत्न केले

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page