रस्त्यामधील येणारा डिपी पोल हटवा व इतर प्रलंबित कामे पूर्ण करा;दादा ढेकणे यांची मागणी…

Spread the love

रत्नागिरी आठवडा बाजार रोड ते धमालणीचा पारकडे जाणाऱ्या रस्त्यामधील येणारा डिपी पोल हटवा व इतर प्रलंबित कामे पूर्ण करा. अशी मागणी भाजप जिल्हा चिटणीस परशुराम प्रभाकर ढेकणे यांनी केली आहे.

आठवडा बाजार ८० फुटी रोड ते धमालणीचा पारकडे जाणाऱ्या रोडच्या सुरवातीला रस्त्यामधील येणारा डिपी पोल असल्याकारणाने रस्ता अरुंद होतो त्यामुळे वाहतुकीला तसेच शाळेच्या मुलांना जाण्या येण्यासाठी खुप त्रास होतो आहे, तरी डिपी पोल हटविण्यात यावे, तसेच पटवर्धन हायस्कुल प्रवेशद्वारा समोरील गटार चे प्रलंबित काम पुर्ण करण्यात यावे व नवनीत स्टेशनरीच्या समोरील रस्त्यामधील पोल हा खुप अडचणीचा ठरत असून त्यामुळे तेथे लहान-मोठे अपघात होतात. रस्त्याचे रुंदीकरण झाले आहे. परंतु, रस्त्याच्या मध्ये पोल असलेमुळे रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आहे. त्यामुळे तो पोल हलविण्यात यावा. सदर विनंतीपूर्वक अर्जाचा विचार करून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे दादा ढेकणे यांनी रत्नागिरी नगर परिषद व महावितरणकडे केली आहे..

यावेळी योगेश हळदवणेकर, डॉ. ऋषिकेश केळकर, निलेश आखाडे, भालचंद्र साळवी इत्यादी उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page