दिनांक 3 जून 2024 जाणून घेऊया आजच्या राशिभविष्य मधून कोणत्या राशीसाठी आजचा दिवस लाभदायी? वाचा राशी भविष्य…

Spread the love

ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलाचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा हा प्रभाव शुभ असतो, तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगलं राहील हे आपण या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.

*▪️मेष :*

आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजच्या दिवसाची सुरूवात आपण स्फूर्तीने आणि उत्साहानं कराल. मित्र, सगे सोयरे यांच्या येण्या जाण्यानं घरातील वातावरण आनंदाचं राहील. त्यांची अचानक भेट आपणास आनंदित करेल. आज आर्थिक फायदा होण्याची सुद्धा शक्यता आहे. प्रवासाची तयारी ठेवा. नवीन कामे सुरू करू शकाल. उत्तम भोजनाचा लाभ मिळेल.

*▪️वृषभ :*

आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका. आज गैरसमज होण्याची शक्यता आहे. प्रकृती खराब असल्यामुळं मन उदास बनेल. कुटुंबात मतभेद निर्माण झाल्यानं आपलं मन दुःखी होईल. कष्टाचा योग्य मोबदला न मिळाल्यामुळं नाराज व्हाल. दिवस खर्चाचा आहे.

*▪️मिथुन :*

आज चंद्र मेष राशीत आहे. आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील. समाजात मान आणि प्रतिष्ठा वाढेल. मित्रांकडून फायदाही होईल, त्यांच्यासाठी पैसेही खर्च होईल. एखाद्या सुंदर जागी पर्यटनासाठी गेल्यानं संपूर्ण दिवस आनंददायी होऊ शकेल. विवाहेच्छुकांना विवाह ठरविण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. पत्नी आणि संतती ह्यांच्याशी सुसंवाद राहिल्यानं दांपत्य जीवनात गोडवा निर्माण होईल.

*▪️कर्क :*

आज चंद्र मेष राशीत आहे. आज गृह सजावटीवर आपण विशेष लक्ष द्याल. घरगुती वापराचे नवीन साहित्य खरेदी कराल. व्यापारी, नोकरदार लाभाची किंवा बढतीची अपेक्षा करू शकतात. कुटुंबात सुख- शांती नांदेल. सरकारी लाभ मिळतील. आपली प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक लाभ होईल. आज सर्व कामे शांतपणे आणि व्यवस्थितपणे पार पाडू शकाल.

*▪️सिंह :*

आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. संताप असल्यामळं काम करण्यात आपलं मन लागणार नाही. वादविवादात आपल्या अहंकारामुळं कोणाची नाराजी ओढवून घ्याल. आरोग्याकडं लक्ष द्यावं लागेल. उतावीळपणामुळं निर्णय घेऊन किंवा वाटचाल करून नुकसान होण्याची शक्यता आहे. नोकरी-व्यवसायात अडचणी आल्यानं नियोजित काम पूर्ण होऊ शकणार नाही. एखाद्या प्रवासाचं नियोजन कराल.

*▪️कन्या :*

आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज आपण एखादे काम हाती घेणं हिताचं ठरणार नाही. बाहेरच्या खाण्यामुळं प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. क्रोधावर नियंत्रण ठेवण्यासाठी मौन हेच शस्त्र उपयुक्त ठरेल. पैसा जास्त खर्च होईल. हितशत्रू पासून सावध राहा. आग, पाणी यापासून जपून राहावं. सरकार विरोधातील काम किंवा अवैध प्रवृत्ती ह्यामुळं संकट ओढवेल.

*▪️तूळ :*

आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस प्रणय, प्रेमालाप, मनोरंजन व मौज-मस्ती करण्याचा आहे. सार्वजनिक जीवनात महत्व मिळेल. यश, कीर्ती वाढेल. भागीदारांशी लाभाच्या गोष्टी होतील. वस्त्रे, अलंकार यांची खरेदी होईल. उत्तम दांपत्यसुख व वाहनसुख मिळेल. प्रकृती व मनःस्वास्थ्य उत्तम राहील. मित्रांसह सहलीला जाल.

*▪️वृश्चिक :*

आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज आपण निश्चिंतपणा व सुखशांतीमध्ये घरात वेळ घालवाल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य कार्य करण्यासाठी उत्साह देईल. कामाच्या ठिकाणी सहकारी वर्गाची खूप मदत झाल्यानं अनेक कामे हाता वेगळी कराल. अपूर्ण कामे तडीस जातील. आर्थिक लाभामुळं खर्च आपला ताण वाढविणार नाही.

*▪️धनू :*

आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपण संततीचा अभ्यास आणि स्वास्थ्य ह्यामुळं चिंतीत व्हाल. पोटाच्या तक्रारी सतावतील. कामातील अपयशाने आपण निराश व्हाल. रागावर नियंत्रण ठेवावं लागेल. साहित्य, लेखन आणि कला ह्या विषयांची गोडी वाढेल. प्रिय व्यक्तीचा सहवास संस्मरणीय होईल. आज वाद-विवाद किंवा चर्चा ह्यात भाग घेऊ नका.

*▪️मकर :*

आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र चौथ्या स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा असल्यानं मन खिन्न होईल. शारीरिक स्फूर्ती, तरतरी ह्यांचा अभाव राहील. सार्वजनिक जीवनात मानहानी होण्याचा संभव आहे. एखादा आजार संभवतो. एखाद्या स्त्रीमुळं अडचणीत येऊ शकता.

*▪️कुंभ :*

आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज आपण तना-मनाने प्रसन्न व्हाल. मनात असलेले चिंतेचे मळभ दूर होऊन उत्साह वाढेल. भाऊबंदांसह नवीन योजना ठरवाल. त्यांच्यासह आनंदात वेळ जाईल. लहान प्रवास होतील. मित्राच्या सहवासानं आपलं मन आनंदीत होईल. आपल्या कार्यक्षेत्रात कौशल्य पूर्वक उत्तम यश मिळवाल.

*▪️मीन :*

आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आजचा दिवस आर्थिक नियोजन करण्यासाठी अनुकूल आहे. नियोजित कामे पूर्ण होतील. प्राप्तीत वाढ होईल. कुटुंबात सुख शांतीचं वातावरण असेल. उत्कृष्ट भोजन मिळेल. स्वास्थ्य ठीक राहील, तसेच मनाचे स्वास्थ्य सुद्धा आपण चांगलं टिकवून ठेवाल.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page