दिनांक 23 मार्च 2024 जाणून घेऊया आजच्या राशिभविष्य मधून’या’ राशीच्या लोकांना मिळेल कामात यश; वाचा राशी भविष्य…

Spread the love

ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा हा प्रभाव शुभ असतो तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.

▪️मेष :

आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशी पासून पाचवा भावात असेल. आपल्या तापट स्वभावावर आज नियंत्रण ठेवणं हितावह राहील. मानसिक थकवा जाणवेल. कष्टाच्या मानाने प्राप्ती कमी होईल. संतती विषयी काळजी राहील. कामाच्या व्यापामुळं कुटुंबियांना वेळ देऊ शकणार नाही. सरकारी कामात मात्र यश मिळेल. पोटाचे विकार संभवतात.

▪️वृषभ :

आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशी पासून चौथ्या भावात असेल. आज आपण कोणतेही कार्य खंबीर मनोबल आणि दृढ आत्मविश्वास याच्या जोरावर पूर्ण कराल. पैतृक घराण्याकडून आपणाला लाभ होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी वाटेल. सरकारी कामात आर्थिक यश मिळेल. संततीसाठी पैशांची गुंतवणूक करू शकाल.

▪️मिथुन :

आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशी पासून तिसरा भावात असेल. आजचा दिवस नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल आहे. शासनाकडून काही लाभ होतील. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. भावंडे आणि शेजारी यांच्याशी असलेले गैरसमज दूर होतील. वैचारिक बदल संभवतो. आर्थिक व्यवहारात मात्र सावधानता बाळगावी लागेल.

▪️कर्क :

आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दुसरा भावात असेल. आज नकारात्मक विचार दूर सारावं लागतील. शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. निराशा आणि असंतोषाची भावना होईल. कुटुंबियांशी गैरसमज होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अपेक्षित परिणाम मिळू शकणार नाही. अवैध गोष्टींपासून शक्यतो दूरच राहावं.

▪️सिंह :

आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशी पासून प्रथम भावात असेल. आज आपला आत्मविश्वास दांडगा असेल. कोणतेही काम करण्याचा निर्णय आपण झटकन घेऊ शकाल. वडील व वडीलधार्यांकडून लाभ होतील. सामाजिक मान – मरातब वाढेल. वाणी आणि कृती यावर नियंत्रण ठेवणं हितावह राहील. काही कारणानं आपल्या रागाचं प्रमाण वाढेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.

▪️कन्या :

आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशी पासून बारावा भावात असेल. आज एखाद्या व्यक्तीशी आपला वाद होण्याची शक्यता आहे. शारीरिक थकवा आणि मानसिक तणाव वाढेल. एखाद्या गोष्टीवरून मित्रांशी गैरसमज होतील. स्वभावात तापटपणा वाढेल. एखाद्या मांगलिक कार्यासाठी खर्च होईल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. अचानकपणे खर्च उदभवतील. शक्यतो भांडणा पासून दूर राहावं.

▪️तूळ :

आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशीपासून लाभात भावात असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातून झालेल्या लाभातून आपल्याला समाधान मिळेल. प्राप्तीत वाढ संभवते. मित्रांकडून फायदा होईल पण त्यांच्यासाठी खर्च सुद्धा करावा लागेल. एखाद्या पर्यटन स्थळाला भेट देऊन आपले मन प्रफुल्लित होईल. भिन्नलिंगी मित्रांशी झालेली भेट आनंददायी ठरेल. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळेल. उत्तम भोजन प्राप्ती होईल.

▪️वृश्चिक :

आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दशमात भावात असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नोकरी – व्यवसायातील वातावरण अनुकूल असेल. वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल. मान आणि प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत बढतीही होऊ शकते. कौटुंबिक जीवनात संततीची प्रगती झाल्यानं आपलं समाधान होईल.

▪️धनू :

आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशी पासून भाग्यात भावात असेल. आज आपली प्रकृती नरम गरम राहील. आळस आणि अशक्तपणा जाणवेल. मनाला चिंता लागून राहील. व्यवसायात अडथळे येतील. शक्यतो नकारात्मक विचारां पासून दूर राहावं. कोणतीही योजना विचारपूर्वक अंमलात आणा. प्रतिस्पर्धी आणि विरोधक यांच्याशी संभाव्य वाद टाळा.

▪️मकर :

चंद्र आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशी पासून अष्टमात भावात असेल. आज अचानकपणे खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. हा खर्च आजारपणावर, व्यावहारिक किंवा सामाजिक कामासाठी बाहेर जावे लागल्यामुळं होऊ शकतो. खाण्या – पिण्याकडं लक्ष द्यावं लागेल. क्रोध तसेच नकारात्मक विचारांवर संयम ठेवावा लागेल. नोकरी- व्यवसायात मात्र अनुकूलता राहील. भागीदारांशी मतभेद संभवतात.

▪️कुंभ :

आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सातवा भावात असेल. आजचा दिवस प्रणयाराधनेसाठी अनुकूल आहे. प्रत्येक काम आपण आत्मविश्वापूर्वक कराल. प्रवास, सहलीची शक्यता आहे. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेण्याची आणि नवीन वस्त्रपरिधान करण्याची संधी लाभेल. भागीदारीतून फायदा होईल. वाहन सौख्य मिळेल.

▪️मीन :

आज सिंह राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सहावा भावात असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आपले मनोबल आणि आत्मविश्वास दृढ असेल. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. घरात सुखशांती नांदेल. स्वभावातील तापटपणा संयमित ठेवावा लागेल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. स्त्रीयांना माहेरहून चांगली बातमी मिळेल.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page