दिनांक 22 मे 2024 जाणून घेऊया आजच्या राशिभविष्य मधून कोणत्या राशीसाठी आजचा दिवस लाभदायी? वाचा राशी भविष्य…

Spread the love

ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलाचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा हा प्रभाव शुभ असतो, तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगलं राहील हे आपण या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.

▪️मेष :

आज चंद्र तूळ राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातवा स्थानी असेल. वैवाहिक जीवनाच्या दृष्टीनं आजचा दिवस फारच चांगला आहे. जोडीदारासह वैवाहिक जीवनाचा आनंद सुद्धा उपभोगू शकाल. आर्थिक लाभ तसेच प्रवास संभवतात. राग आणि अधिकार गाजविण्याची भावना वाढेल. आपल्या कामाचं कौतुक होईल. शक्यतो वाद टाळा. वाहनसुख चांगलं मिळेल.

▪️वृषभ :

आज चंद्र बुधवारी तूळ राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. पूर्ण दिवस आनंद आणि उत्साहात जाईल. नियोजनाप्रमाणं सर्व कामे पार पडतील. आर्थिक लाभ संभवतात. स्त्रियांना माहेरहून एखादी चांगली बातमी मिळून काही लाभ होण्याची शक्यता आहे. आजारी लोकांचे आरोग्य सुधारेल. कार्यालयीन कामे पूर्ण होतील.

▪️मिथुन :

आज चंद्र तूळ राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र पाचवा स्थानी असेल. आज शरीर आणि मन बेचैन राहील. नवीन कार्य सुरू करण्याचा बेत आखाल पण काम सुरू करण्यात अडचणी येतील. मानहानी होण्याची शक्यता आहे. संततीविषयक कामासाठी खर्च करावा लागेल. पचनसंस्येचे विकार बळावतील. जोडीदाराच्या तब्बेतीची सुद्धा चिंता वाटेल. विद्यार्थ्यांसाठी फार चांगला दिवस. प्रवासात त्रास संभवतो.

▪️कर्क :

आज चंद्र तूळ राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आज आनंद आणि उत्साह यांचा अभाव राहील. मन चिंतेनं ग्रासलेलं आणि अशांत राहील. घरात भांडणाचं वातावरण असेल. मतभेद होऊ शकतात. स्त्रियांबरोबर सुद्धा मतभेद आणि तणाव राहील. पैसा खर्च होईल. अपयश मिळेल. झोपही शांत मिळणार नाही. एखादी मानहानी संभवते.

▪️सिंह :

आज चंद्र तूळ राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आज आरोग्य उत्तम राहील. भावंडांसह आनंदात वेळ जाईल. त्यांच्याकडून फायदा होईल. एखादया सुंदर स्थळाला भेट देण्यास जाल. मित्र भेटतील. कार्य यशस्वी झाल्याने मित्र आनंदीत होतील. भावनिक संबंध प्रस्थापीत होतील. कलाक्षेत्रात रुची राहील. मानसिकदृष्टया दिवस चांगला जाईल.

▪️कन्या :

आज चंद्र तूळ राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र दुसरा स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आपल्या गोड बोलण्यानं कोणाचेही मन जिंकू शकाल. कामे सफल होण्याची जास्त शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. त्यांच्यासह दिवस आनंदात जाईल. आर्थिक लाभ संभवतात. आरोग्य उत्तम राहील. प्रवासाचे बेत ठरतील. बौद्धिक चर्चेत सहभागी होण्याची संधी मिळेल, मात्र त्यात संभाव्य वाद टाळावे लागतील. स्वादिष्ट बोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. आयात-निर्यात संबंधित व्यापारात यश प्राप्ती होईल.

▪️तूळ :

आज चंद्र तूळ राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. रचनात्मक आणि कलात्मक शक्तीची चमक दिसेल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याची काळजी घ्यावी लागेल. विधायक कार्य हातून घडेल. खंबीर विचारानं काम पूर्ण कराल. आर्थिक योजना ठरवाल. प्रिय व्यक्तीसह दिवस आनंदात घालवू शकाल. अलंकार, मनोरंजन, आनंद इत्यादींसाठी पैसा खर्च होईल.

▪️वृश्चिक :

आज चंद्र तूळ राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र बारावा स्थानी असेल. आज मनोरंजन, आनंद ह्यासाठी पैसा खर्च होईल. चिंता आणि शारीरिक कष्ट यामुळं आपण त्रासून जाल. एखादा अपघात संभवतो. गैरसमज होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी लागेल. स्वभाव रागीट बनेल म्हणून भांडणापासून दूर राहावं लागेल. संबंधितांबरोबर काही अप्रिय घटना घडू शकते. आज मानहानी आणि धनहानी होण्याची शक्यता आहे. न्यायालयीन कामे जपून करा. अविचाराने केलेला व्यवहार अडचणीत आणू शकतो.

▪️धनू :

आज चंद्र तूळ राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र लाभात स्थानी असेल. आर्थिक, सामाजीक आणि कौटुंबिक दृष्टीनं आजचा दिवस लाभदायी आहे. वैवाहिक जीवनात पूर्णतः आनंद मिळेल. प्रेमाचा सुखद आनंद घेऊ शकाल. मित्रांसह एखाद्या रम्य स्थळी फिरायला जावू शकाल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरण्याची शक्यता आहे. संतती आणि पत्नीकडून लाभ होईल. व्यापारात फायदा होऊन उत्पन्नात वाढ होईल. स्त्री वर्गाकडून लाभ होईल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल.

▪️मकर :

आज चंद्र तूळ राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस संघर्षाचा आहे. आज अग्नी, पाणी आणि वाहन ह्यापासून एखादा अपघात संभवतो. व्यापारात कार्यमग्न राहाल. व्यापारा निमित्त प्रवास करावा लागेल आणि त्याचा फायदा सुद्धा होईल. वरिष्ठांची मर्जी राहील. नोकरीत बढती मिळेल. संततीच्या शिक्षणा विषयी समाधान वाटेल. वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकाल. पैसा आणि प्रतिष्ठा मिळेल. मित्र आणि नातेवाईकांकडून लाभ होतील.

▪️कुंभ :

आज चंद्र तूळ राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. प्रकृती नरम गरम राहील. तरीही मनस्वास्थ्य चांगलं राहील. कामाचा उत्साह कमी होईल. वरिष्ठांशी सांभाळून राहावं लागेल. अकारण खर्च वाढेल. आनंद-सोहळा, प्रवास-पर्यटन यावर पैसा खर्च होईल. प्रवास आणि सहलीची शक्यता आहे. परदेशातून काही बातमी मिळेल. संततीविषयक काळजी राहील. प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतात.

▪️मीन :

आज चंद्र तूळ राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज आपणास अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे. मानसिक तसेच शारीरिक श्रमामुळं स्वास्थ्य खराब होऊ शकते. सर्दी, श्वसनाचा त्रास, खोकला आणि पोट दुखी यांचा जोर वाढेल. खर्चात वाढ होईल. शक्यतो जलाशयापासून दूर राहावं. इस्टेटीतून फायदा होईल. अवैधकामापासून दूर राहावं. आपले श्रम कमी करण्यासाठी प्रयत्नशील राहा.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page