दिनांक 17 जून 2024 जाणून घेऊया आजच्या राशिभविष्य मधून ‘मेष ते मीन’ सर्व राशींसाठी कसा असेल आजचा दिवस? वाचा राशी भविष्य…

Spread the love

ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलाचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा हा प्रभाव शुभ असतो, तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगलं राहील हे आपण या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.

*▪️मेष (ARIES) :* आज चंद्र तूळ राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातवा स्थानी असेल. आज सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रांत आपण प्रशंसेस पात्र ठराल. धनलाभ संभवतो. कौटुंबिक जीवनात सुख व संतोष अनुभवाल. बौद्धिक चर्चेत सहभागी व्हाल. वाणीवर संयम राखणे आवश्यक आहे. वैचारिक गोष्टीत उत्साह वाटेल. एखाद्या व्यवहारातून अधिक लाभ होण्याची शक्यता आहे.

*▪️वृषभ (TAURUS) :* आज चंद्र तूळ राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस खूप आनंदात जाईल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. आपले काम निर्धारित वेळेत पूर्ण होईल. आर्थिक लाभ संभवतात. अपूर्ण कामे पूर्ण होतील. स्त्रीयांना माहेरहून आनंददायी बातम्या मिळून काही लाभ सुद्धा होईल. आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत सुधारणा होईल. सहकार्‍यांकडून लाभ संभवतो.

*▪️मिथुन (GEMINI) :* आज चंद्र तूळ राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र पाचवा स्थानी असेल. आज वैवाहिक जोडीदार व संतती ह्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. शक्यतो वाद – विवाद व बौद्धिक चर्चे पासून दूर राहावे. मानहानी संभवते. मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता आहे. पोटाच्या तक्रारी त्रास देतील. नव्या कार्याचा आरंभ करण्यात अडचण येण्याची शक्यता आहे. प्रवासात त्रास संभवतो.

*▪️कर्क (CANCER) :* आज चंद्र तूळ राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या स्थानी असेल. आज आपलं मन दुःखी राहील. प्रफुल्लता, स्फूर्ती आणि आनंद यांचा अभाव दिसून येईल. कुटुंबीयांशी मतभेद संभवतात. पैसा खर्च होईल व कामात अपयश येईल. भोजन वेळेवर मिळणार नाही. निद्रानाश त्रास देईल. छातीच्या विकारांचा त्रास जाणवेल.

*▪️सिंह (LEO) :* आज चंद्र तूळ राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस सुखा समाधानात जाईल. भावंडाबरोबरच्या संबंधात जवळीक निर्माण होईल. त्यांचे सहकार्य पण आपणास मिळेल. संबंधांमधील भावनांची जाणीव आपणाला होईल. एखाद्या रम्य स्थळी सहलीला जाण्याचा बेत ठरवू शकाल. मानसिक चिंता दूर होतील. कार्यात यशस्वी व्हाल.

*▪️कन्या (VIRGO) :* आज चंद्र तूळ राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र दुसरा स्थानी असेल. आज कुटुंबातआनंदाचे वातावरण राहील. इतरांशी गोड बोलून आपण आपले निर्धारित काम पूर्ण करू शकाल. प्रकृती उत्तम राहील. वाद होण्याच्या शक्यतेमुळं कोणाशी बौद्धिक चर्चा करणे टाळावे. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. प्रवास होतील. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. विद्यार्थ्यांना आजचा दिवस प्रतिकूल आहे.

*▪️तूळ (LIBRA) :* आज चंद्र तूळ राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपण आर्थिक नियोजन व्यवस्थितपणे करू शकाल. सृजनशीलता वाढेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. दृढ विचारांमुळं हाती घेतलेले काम पूर्ण कराल. आत्मविश्वास वाढेल. आनंद, हर्ष व मनोरंजनावर पैसा खर्च कराल.

*▪️वृश्चिक (SCORPIO) :* आज चंद्र तूळ राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र बारावा स्थानी असेल. आज एखादा अपघात किंवा शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. एखाद्याशी वाद सुद्धा संभवतात. आपल्या वक्तव्यानं गैरसमज पसरण्याची शक्यता आहे. शारीरिक कष्ट व मानसिक चिंता यामुळे त्रस्त व्हाल. हर्ष आनंदासाठी खर्च करावा लागेल. कुटुंबियांशी मतभेद संभवतात.

*▪️धनू (SAGITTARIUS) :* आज चंद्र तूळ राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. वैवाहिक जीवनाचा पूर्ण आनंद उपभोगू शकाल. मित्रांसह रम्य ठिकाणी प्रवासास जाण्याचा बेत आखाल. उत्पन्नात वाढ संभवते. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल.

*▪️मकर (CAPRICORN) :* आज चंद्र तूळ राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र दशमात स्थानी असेल. आज व्यावसायिक कामात आपणाला लाभ होईल. जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. सरकार, मित्र व संबंधितांकडून लाभ होईल. त्यांच्याकडून भेटवस्तू मिळाल्याने आपणास आनंद होईल. अग्नी, पाणी, अचानक आपत्ती ह्यापासून मात्र सावध राहावे लागेल. व्यावसायिक कार्यासाठी धावपळ होईल. संततीच्या अभ्यासातील प्रगतीमुळे आनंदित व्हाल. आपल्या प्रतिष्ठेत भर पडेल.

*▪️कुंभ (AQUARIUS) :* आज चंद्र तूळ राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. मानसिक स्वास्थ्य मात्र चांगले राहील. शरीरात स्फूर्ती कमी असल्यानं काम करण्यात उत्साह वाटणार नाही. वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. हर्षोल्हासासाठी पैसा खर्च होईल. प्रवास संभवतात. परदेशातून काही चांगल्या बातम्या येतील. संततीची मात्र काळजी वाटेल.

*▪️मीन (PISCES) :* आज चंद्र तूळ राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र अष्टमात स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. मानसिक आणि शारीरिक कष्ट अधिक होतील. अचानक धनलाभ संभवतो. व्यापारी वर्गाला जुनी येणी वसूल होतील. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. चुका होऊ नयेत, म्हणून संयमित राहणं हितावह राहील.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page