दिनांक 17 ऑगस्ट 2024 जाणून घेऊया जराशी भविष्य मधून ‘या’ राशींवर शनीचा राहील प्रभाव; वाचा राशीभविष्य..

Spread the love

ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलाचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा हा प्रभाव शुभ असतो, तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन चांगलं राहील हे आपण  या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.

*मेष (ARIES) :*

आज चंद्र धनु राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात भावात असणार आहे. आज नकारात्मक विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहावं लागेल. अन्यथा आळस व दुःखात वाढ होईल. प्रकृती नरम गरमच राहील. मात्र, हातातील कार्ये सहजपणे पार पडतील. प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद टाळा. दुपार नंतर परिस्थिती सुधारेल. आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. आज व्यावसायिक कामानिमित्त प्रवास करावा लागेल. इतरांना मदत करण्याचा आपण प्रयत्न कराल.

*वृषभ (TAURUS) :*

आज चंद्र धनु राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र अष्टमात भावात असणार आहे. आज आपल्या हातून एखादे सरकार विरोधी कार्य होण्याची शक्यता असल्यानं सावध राहावं लागेल. नवीन कार्यात अडचणी येतील. प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. काही ना काही कारणानं काळजी वाटेल. उक्ती आणि कृती ह्यात संतुलन ठेवावं लागेल. व्यवसायात अडचणी उदभवतील. नशिबाची साथ मिळणार नाही. वरिष्ठांची नाराजगी ओढवून घ्यावी लागेल. संततीविषयक काळजी निर्माण होईल.

*मिथुन (GEMINI) :*

आज चंद्र धनु राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातवा भावात असणार आहे. आजचा दिवस सौख्यदायी आहे. मात्र, आपण दिवसभर आपली दैनंदिन कामेच करत राहाल. मन प्रसन्न राहण्यासाठी आपण मनोरंजनाचा आधार घ्याल. या आनंदात मित्र व संबंधितांना सहभागी करून घ्याल. दुपारनंतर मात्र मनात चिंता निर्माण होतील. हळवेपणाचे प्रमाण वाढेल. संतापावर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.

*कर्क (CANCER) :*

आज चंद्र धनु राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहावा भावात असणार आहे. आज व्यावसायिक वातावरण आपणास अनुकूल राहील. स्त्रियांना माहेरहून आनंददायी बातमी मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. शारीरिक, मानसिक स्वास्थ्य चांगलं राहील. बौद्धिक चर्चेत तार्किक विचारांचा वापर करायला आजचा दिवस अनुकूल आहे. सामाजिक सन्मान होईल. भागीदारांकडून लाभ होतील.

*सिंह (LEO) :*

आज चंद्र धनु राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र पाचवा भावात असणार आहे. आजचा दिवस प्रणयाराधनेसाठी अनुकूल आहे. रागावर नियंत्रण ठेवा. पोटाच्या व्याधी त्रास देतील. दुपारनंतर घरात आनंद- उत्साहाचं वातावरण राहील. मानसिक प्रसन्नता आणि उत्साह जाणवेल. व्यवसायात लाभ संभवतो. सहकारी अपेक्षित सहकार्य करतील, त्यामुळं आपला आनंद द्विगुणित होईल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल.

*कन्या (VIRGO) :*

आज चंद्र धनु राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या भावात असणार आहे. आज शारीरिक स्वास्थ्य, मानसिक तरतरी व चेतना शक्तीचा अभाव राहील. सामाजिक स्तरावर मानहानी संभवते. धनहानी सुद्धा संभवते. रागावर नियंत्रण ठेवा. कार्य साफल्य न झाल्यानं निराश व्हाल. संततीविषयक चिंता सतावेल. शक्यतो प्रवास टाळा.

*तूळ (LIBRA) :*

आज चंद्र धनु राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र तिसरा भावात असणार आहे. आजचा दिवस नवे कार्य हाती घेण्यास अनुकूल आहे. प्रिय व्यक्तीच्या भेटीने आनंद होईल. भाग्योदय होईल. समाजात मान- सन्मान मिळतील. दुपारनंतर मात्र मन उदास होईल. शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. घरातील वातावरण क्लेशकारक राहील. स्थावर संपत्तीविषयक कागदपत्रा बद्दल सावध राहावं लागेल. आईची तब्बेत बिघडू शकते.

*वृश्चिक (SCORPIO) :*

आज चंद्र धनु राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र दुसरा भावात असणार आहे. नियोजित काम पूर्ण न झाल्यानं नैराश्य येईल. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे आज टाळावे. घरगुती वातावरण क्लेशदायी राहील. दुपारनंतर भावंडांसह आनंदात वेळ घालवाल. प्रतिस्पर्ध्यांना पराभूत कराल. शारीरिक, मानसिक स्वास्थ्य चांगलं राहील. प्रवास घडतील. गूढ विषयांचं आकर्षण होईल.

*धनू (SAGITTARIUS) :*

आज चंद्र धनु राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. आज आपणाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. एखाद्या मंगल कार्यात सहभागी व्हाल. प्रवास संभवतो. वैवाहिक जीवनात सुख व आनंद मिळेल. दुपारनंतर कुटुंबात काही कारणास्तव वाद होतील. केलेल्या कामाचं अपेक्षित फळ न मिळाल्यानं नैराश्य येईल. अंतिम व ठोस निर्णय घेण्यासारखी मनःस्थिती असणार नाही.

*मकर (CAPRICORN) :*

आज चंद्र धनु राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र बारावा भावात असणार आहे. आज कोणाला जामीन राहू नये, अन्यथा अडचणीत सापडाल. शारीरिक, मानसिक आरोग्याकडं लक्ष द्यावं लागेल. आपल्या बोलण्या वागण्यात संयमित राहावं लागेल. अपघाताची शक्यता असल्यानं वाहन जपून चालवावे लागेल. दुपारनंतर प्रकृतीत सुधारणा होईल. मन प्रसन्न होईल. घरातील वातावरण चांगलं राहील. हातून परोपकार किंवा एखादे सत्कार्य घडेल.

*कुंभ (AQUARIUS) :*

आज चंद्र धनु राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र लाभात भावात असणार आहे. आजचा दिवस लाभदायी आहे. आर्थिक व सामाजिक क्षेत्रांत प्रगती होईल. नवीन परिचय होतील. परंतु दुपारनंतर प्रकृती बिघडेल. कौटुंबिक वातावरण गढूळ होईल. पैसा जास्त खर्च होईल. कोर्ट- कचेरीच्या कामांत सावध राहावं लागेल. स्वभाव चिडचिडा होईल.

*मीन (PISCES) :*

आज चंद्र धनु राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र दशमात भावात असणार आहे. आज द्विधा मनःस्थितीमुळं आपले विचार ठाम राहू शकणार नाहीत. नोकरीत वरिष्ठांकडून लाभ होतील. पदोन्नती संभवते. व्यापार विषयक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. कुटुंबात सुख समाधान नांदेल. वडीलधार्‍यांकडून लाभ होतील. आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक पातळीवर सुद्धा लाभ संभवतात. मित्रांसह सहलीस जाण्याचं आयोजन करू शकाल.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page