दिनांक 16 मार्च 2024 जाणून घेऊया आजच्या राशिभविष्य मधून ‘या’ राशींच्या व्यक्तींची मैत्रिणींशी होईल भेट, हा होईल लाभ; जाणून घ्या आजचं राशीभविष्य…

Spread the love

कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 24 जून च्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ.

▪️मेष :

आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज आपणास आर्थिक व्यवहार सावधपणे करावे लागतील. वाद – विवादापासून दूर राहिल्यास कुटुंबीयांशी निर्माण होणारी कटुता टाळू शकाल. खाण्या – पिण्याची काळजी घ्या, नाहीतर स्वास्थ्य बिघडवू शकते. भोजन वेळेवर घेता येणार नाही. विनाकारण खर्च होतील. घरी तसेच व्यवसायात समजूतदारपणा दाखविणे आपणास फायदेशीर राहील. आजचा दिवस आपल्यासाठी सामान्य आहे.

▪️वृषभ :

आजचा दिवस फायद्यानं भरलेला आहे. आज आपण शरीर आणि मनानं स्वस्थ राहाल. तसेच पूर्ण वेळ ताजेतवानं राहाल. आपल्यात असलेली कलात्मकता आणि सृजनात्मकता यांचा उपयोग कराल. आर्थिक योजना बनवाल. धनलाभ सुद्धा होऊ शकतो. कुटुंबीयांसह आनंदात वेळ घालवाल. आज नवे कपडे आणि दागिने याची खरेदी झाल्यानं दिवस आनंदात जाईल. आत्मविश्वासात वृद्धी होईल.

▪️मिथुन :

आपल्यासाठी चंद्र बाराव्या स्थानी असेल. आज आपणास आपल्या बोलण्यावर आणि व्यवहारात सावध राहावं लागेल. आपल्या वक्तव्यानं काही गैरसमज होण्याची शक्यता आहे. आपलं स्वास्थ्य खराब असू शकेल. विशेषतः डोळ्यांचा त्रास संभवतो. त्याकडं लक्ष द्यावे लागेल. आजचा दिवस खर्चाचा आहे. मनाला चिंता लागून राहील. एखादा अपघात संभवतो. मानसिक शांतीसाठी प्रयत्न करावे लागतील.

▪️कर्क :

आजचा दिवस लाभदायी आहे. नोकरी – व्यवसायातील वातावरण अनुकूल असेल. धनलाभाची शक्यता आहे. मित्रांकडून विशेषतः स्त्रीवर्गाकडून फायदा होईल. मित्रांसह प्रवासाला जाऊ शकाल. प्रिय व्यक्तीसह वेळ चांगला जाईल. आर्थिक योजना यशस्वी होतील. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. शरीर आणि मन स्वस्थ राहील.

▪️सिंह :

आज आपणास प्रत्येक कामात उशीरा यश मिळेल. कार्यालयात किंवा घरात जबाबदार्‍यांचं ओझं वाढेल. जीवनात अधिक गंभीरतेचा अनुभव होईल. नवीन संबंध स्थापित करणं किंवा कामासंबंधी महत्वाचा निर्णय घेणं हे टाळा. पित्याशी मतभेद होतील. शुभ कार्य ठरविण्यासाठी आजचा दिवस अनुकूल नाही.

▪️कन्या :

आज शरीरात थकवा, आळस आणि चिंता अनुभवास येतील. संतती बरोबर मतभेद होतील. त्यांच्या स्वास्थ्याची चिंता सतावेल. नोकरीत वरिष्ठांशी आपला वाद होईल. राजनैतिक संकटांचा सामना करावा लागेल. एखादे मांगलिक कार्य किंवा प्रवास यासाठी पैसा खर्च होईल. भावंडांकडून लाभ होण्याची शक्यता आहे.

▪️तूळ :

आज प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. टाकून बोलणं किंवा खराब व्यवहार यामुळे वाद आणि भांडणं होतील. क्रोध आणि कामवृत्ती यावर संयम ठेवणं आवश्यक आहे. हितशत्रू सरसावतील. अचानक धनलाभ होईल. वेळेवर जेवण न मिळणं किंवा होणारा अधिक खर्च आपल्या मनाला अस्वस्थ करतील. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. अपघाताची शक्यता असल्यानं जलाशयापासून दूर राहणं हिताचं राहील.

▪️वृश्चिक :

आज आपणास नोकरी, व्यापार किंवा व्यवसाय यातून भरपूर लाभ होणार आहे. तसेच मित्र, थोर मंडळी, सगेसोयरे यांच्याकडूनही लाभ होईल. सामाजिक समारोह, पर्यटन यासारख्या ठिकाणी जाऊ शकाल. आपण आनंदी राहाल. संपत्ती वाढेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील.

▪️धनू :

आजचा दिवस नोकरदारांना लाभदायक आहे. आर्थिक लाभाची शक्यता आहे. घरात आनंदाचं वातावरण राहील. नोकर आणि सहकारी आपणाला मदत करतील. कार्यात सफलता आणि यश मिळेल. विरोधक आणि प्रतिस्पर्धी यांच्यावर मात करू शकाल. मैत्रीणींची भेट होईल.

▪️मकर :

आज कला आणि साहित्य क्षेत्रात असणार्‍या व्यक्ती त्या क्षेत्रात विशेष कामगीरी करतील. आपल्या रचनात्मक आणि सृजनशील शक्तींचा इतरांना परिचय द्याल. प्रेमिकांना परस्परांत गाढ प्रेमाचा अनुभव येईल. त्यांच्या भेटी रोमांचक ठरतील. शेअर – सट्टा यात लाभ होईल. संततीच्या समस्या मिटतील. मित्रांकडून लाभ होईल.

▪️कुंभ :

आज स्वभाव जास्त हळवा बनल्यानं मानसिक अस्वास्थ्य राहील. आर्थिक बाबींचं नियोजन कराल. आईकडून अधिक प्रेमाचा वर्षाव झाल्याचा अनुभव येईल. स्त्रिया सौंदर्य – प्रसाधनं, वस्त्र, अलंकार यांवर जास्त खर्च करतील. विद्यार्थ्यांना यश लाभेल. स्वभावात हट्टीपणा राहील. सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता आहे.

▪️मीन :

आजचा दिवस कार्यात यश मिळण्यास आणि महत्वपूर्ण निर्णय घेण्यास उत्तम आहे. आज विचारांत स्थैर्य असेल. त्यामुळे कोणतंही कार्य व्यवस्थीत करू शकाल. कलाकारांना कला प्रदर्शन करण्याची उत्तम संधी मिळेल. वैवाहिक जोडीदाराशी जवळीक वाढेल. मित्रांसह लहानसा प्रवास कराल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page