ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलाचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा हा प्रभाव शुभ असतो, तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगलं राहील हे आपण या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.
मेष ARIES : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सहावा भावात असेल. आजचा दिवस दूरगामी आर्थिक योजनेसाठी अनुकूल असून आर्थिक आणि व्यावसायिकदृष्टया फायदेशीर आहे. आज शारीरिक आणि मानसिक उत्साह अनुभवाल. मित्रांनकडून भेटवस्तू मिळतील. त्यांच्यासह आनंदात वेळ जाईल. तसेच त्यांच्यासह एखाद्या समारंभास किंवा सहलीस जाऊ शकाल. सद्भावनेने केलेलं परोपकारी काम मनाला आत्मिक आनंद देईल.
वृषभ TAURUS : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून पाचवा भावात असेल. आज आपल्या बोलण्याच्या जादूनं कोणी प्रभावीत होऊन आपला फायदा होईल. तसेच मधुर आणि सौम्य भाषणानं नवे संबंध प्रस्थापित व्हायला मदत होईल. मंगल कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. वाचन-लेखन ह्या सारख्या साहित्य प्रकारात अभिरुची वाढेल. कष्टाच्या मानाने यश कमी मिळत असलं तरीही आपली कामातील तत्परता व कुशलता प्रगतीस सहाय्यक होईल. विद्यार्थी अभ्यासात चांगली प्रगती करू शकतील. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभू शकेल. पोटाच्या तक्रारीनं त्रस्त व्हाल.
मिथुन GEMINI : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून चौथ्या भावात असेल. द्विधा अवस्थेतील आपलं मन महत्वाचे निर्णय घेऊ शकणार नाही. वैचारिक वादळामुळं मानसिक अस्वस्थता अनुभवाल. अधिकतम हळवेपणा आपल्या दृढतेला कमकुवत करेल. पाणी तसेच इतर प्रवाही पदार्थांपासून सावध राहा. कुटुंब किंवा जमीन ह्या संबंधी विषयावर चर्चा किंवा प्रवास टाळा. शारीरिक व मानसिक स्वस्थतेचा अभाव राहील.
कर्क CANCER : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून तिसरा भावात असेल. शारीरिक आणि मानसिक उत्साहाबरोबर घरातील वातावरण सुद्धा आनंदी असेल. मित्र व स्नेहीजन ह्यांचा सहवास घडेल. मित्रांकडून लाभ होईल. मंगल कार्याची सुरूवात करायला आजचा दिवस अनुकूल आहे. कामातील यश आणि प्रियव्यक्तीचा सहवास ह्यामुळं आपण आनंदीत राहाल. आर्थिक लाभ होऊ शकेल. लहान सहलीस जाऊ शकाल. मान-सन्मान वाढेल.
सिंह LEO : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दुसरा भावात असेल. आजचा दिवस कुटुंबियांसह सुख शांतीत घालवाल. त्यांचे सहकार्य मिळेल. स्त्री मित्रांकडून विशेष मदत प्राप्त होईल. दूरचे मित्र आणि स्नेही यांच्याशी संपर्क फायदेशीर ठरेल. आपल्या प्रभावी संभाषणाने लोकांचे लक्ष वेधून घ्याल. प्राप्ती पेक्षा खर्च जास्त होईल. उत्कृष्ट भोजन मिळेल. नियोजित कामात यश जरा कमीच मिळेल.
कन्या VIRGO : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून प्रथम भावात असेल. आजच्या लाभदायक दिवसाने वैचारिक समृद्धी वाढेल. वाकचातुर्य आणि मधुरवाणी ह्यांच्या साह्यानं मैत्रीपूर्ण संबंध विकसीत करू शकाल. उत्तम भोजन, भेटवस्तू, वस्त्र इत्यादींची प्राप्ती होईल. शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. आनंदाची प्राप्ती, जोडीदाराचा सहवास व प्रवास ह्यात आपला दिवस आनंदात जाईल.
तूळ LIBRA : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून बारावा भावात असेल. आज थोडा सुद्धा असंयम आणि अवैध व्यवहार आपणास अडचणीत टाकेल. एखादी दुर्घटना संभवते. बोलण्यातील शिथीलता उग्र तक्रार वाढवण्याची शक्यता आहे. सगे सोयरे ह्यांच्याशी पटणार नाही. मनोरंजन तसेच फिरण्यात पैसे खर्च होतील. भिन्नलिंगी आकर्षणात वाढ होईल. शारीरिक व मानसिक व्यग्रता कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
वृश्चिक SCORPIO : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून लाभात भावात असेल. आज नोकरी-व्यवसायात लाभप्राप्ती होईल. मित्रांसह गाठीभेटी, प्रवास ठरवाल. विवाहोत्सुक तरूण तरूणींसाठी चांगली संधी आहे. संतती किंवा पत्नीकडून लाभ होईल. वाडवडील किंवा थोरले बंधू त्या लाभात निमित्तमात्र बनतील. स्नेही मित्र यांच्याकडून भेटवस्तू मिळतील. वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल.. वैवाहिक जीवनात मनसोक्त आनंद उपभोगू शकाल.
धनू SAGITTARIUS : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दशमात भावात असेल. आजचा दिवस कार्य साफल्याचा आहे. नवे काम सुरू कराल. व्यापारी आपल्या व्यवसायाचे नियोजन आणि विस्तार करू शकतील. मैत्रिणींकडून लाभ होईल. नोकरीत वरिष्ठ अधिकारी आपल्या बढतीचा विचार करतील. गृहजीवनात आनंद व समाधान मिळेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळेल. आर्थिक लाभ होतील. सार्वजनिक जीवनात मान-सन्मान वाढेल.
मकर CAPRICORN : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून भाग्यात भावात असेल. आजचा दिवस बौद्धिक कार्य किंवा साहित्य लेखन ह्यासाठी अनुकूल आहे. व्यवसायात नवे विचार प्रवाह आणल्याने आपल्या कामाला नवे स्वरूप येईल. व्यवसाय क्षेत्रातील प्रतिकूल वातावरण मनाला अस्वस्थ करेल. शारीरिक थकवा जाणवेल. संततीच्या समस्या आपणास त्रस्त करतील. व्यर्थ खर्च होईल. प्रतिस्पर्ध्यांशी वाद टाळा.
कुंभ AQUARIUS : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून अष्टमात भावात असेल. आज आपण नकारात्मक विचारा पासून दूर राहावं. वाद, भांडणे ह्यापासून सुद्धा दूर राहावे. राग व बोलण्यावर संयम ठेवाव. कौटुंबिक वातावरण कलुशित होईल. आर्थिक चणचण जाणवेल. खूप विचार केल्यानं मानसिक थकवा जाणवेल. आपल्या मनावरचा ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करावे.
मीन PISCES : चंद्र आज कन्या राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सातवा भावात असेल. आज आपण दैनंदिन कामातून बाहेर पडून सहलीसाठी किंवा मनोरंजनासाठी वेळ द्याल. स्वजनांसह सहली साठी जाऊ शकाल. सिनेमा, नाटक किंवा बाहेर भोजन करणं असा एखादा कार्यक्रम आखाल. कलाकार किंवा कारागिराना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्याची संधी मिळेल. आजचा दिवस व्यवसायात भागीदारीसाठी अनुकूल आहे. दांपत्य जीवनात अधिक जवळीक निर्माण करता येऊ शकेल. सार्वजनिक जीवनात मान-सन्मान होतील.