श्री मार्लेश्वर यात्रेनिमित्त जिल्हाधिकारी देवेंदर सिंह; विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय शिंदे यानी घेतले मार्लेश्वराचे दर्शन…

Spread the love

मार्लेश्वर/ संगमेश्वर- रत्नागिरी जिल्हा पोलीस अधिक्षक म्हणुन काम केलेले आणि सध्या पुणे पिंपरी चिंचवड येथे पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत असलेले श्री संजय शिंदे यांनी कुटूंबासमवेत श्री मार्लेश्वर देवस्थानला सदिच्छा भेट दिली.या वेळी त्यांचे स्वागत करण्यात आले.

या प्रसंगी मारळचे पोलीस पाटील देवदास सावंत , प्रसाद सावंत , रुपेश सावंत उपस्थित होते.त्यांच्या तर्फे श्री मार्लेश्वराची पुजा करुन त्याना शाल व श्रीफळ देवून त्यांचा सत्कार देवस्थानचे विश्वस्त श्री सुनिल लिंगायत यांच्या हस्ते करण्यात आला.

जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तानी घेतले मार्लेश्वराचे दर्शन

कोकण विभागीय आयुक्त श्री महेंद्र कल्याणकर आणि जिल्हाधिकारी श्री. एम देवेंदर सिह यांनी श्री मार्लेश्वर देवस्थानला सदिच्छा भेट देवुन श्री शंकराचे दर्शन घेतले.
मार्लेश्वर याञेनिमीत्त कोकण विभागीय आयुक्त श्री महेंद्र कल्याणकर आणि रत्नागिरीचे जिल्हाधिकारी श्री एम . देवेंदर सिह यांनी श्री देव मार्लेश्वर देवस्थानला भेट दिली व संपुर्ण परिसराची पहाणी केली.

त्यांच्या तर्फे श्री देव मार्लेश्वर चरणी अभिषेक व पुजा करण्यात आली.
मार्लेश्वर देवस्थानचे अध्यक्ष श्री महादेव लिंगायत , सक्रेटरी- शाम लिंगायत , विश्वस्त श्री सुनिल लिंगायत; पोलीस पाटील- देवदास सावंत,रुपेश सावंत , प्रसाद सावंत यावेळी उपस्थित होते. पुजारी – नंदकुमार गुरव यांच्या हस्ते कोकण विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. या वेळी त्यांच्या समवेत संगमेश्वर तहसिलदार श्रीमती अमृता साबळे , रत्नागिरी तहसिलदार- श्री म्हाञे उपस्थित होते

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page