चंद्राबाबू नायडूंनी घेतली आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ, पवन कल्याण उपमुख्यमंत्री…

Spread the love

चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यांच्या शपथविधीला देशातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. संयुक्त आंध्र प्रदेशचे दोनदा मुख्यमंत्री राहिलेले नायडू आंध्र प्रदेश विभाजनानंतर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. अशा प्रकारे ते चौथ्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत.

अमरावती – तेलुगु देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ते चौथ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री बनले आहेत. विजयवाडा येथील गन्नावरम विमानतळाजवळील केसरपल्ली आयटी पार्क येथे आयोजित भव्य सोहळ्यात राज्यपाल एस अब्दुल नझीर यांनी त्यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली.

या शपथविधीला देशातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. यामध्ये पंतप्रधान मोदींचाही समावेश आहे. शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नायडूंना मिठी मारून त्यांचे अभिनंदन केलं.

🔹️मंत्रिपदाची शपथ कोणी घेतली?

▪️चंद्राबाबू नायडू यांच्या बरोबर ज्या आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली त्यामध्ये जनसेना पक्षाच्या चार आणि भाजपाच्या एका आमदाराचा समावेश आहे. त्याचबरोबर पवन कल्याण यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. याशिवाय टीडीपीचे राष्ट्रीय सरचिटणीस नारा लोकेश आणि केए नायडू यांच्यासह 24 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

🔹️शपथ घेतलेले आमदार-

▪️कोल्लू रवींद्र
▪️नादेंडला मनोहर
▪️पोंगुरु नारायण
▪️अनिता वंगालपुडी
▪️सत्यकुमार यादव
▪️डॉ. निम्मला रामनायडू
▪️नस्यम मोहम्मद फारुक
▪️अनम रामनारायण रेड्डी
▪️पय्यावुला केशव
▪️अनग्नी सत्य प्रसाद
▪️कोळसू पार्थसारथी
▪️डोळा बाळा वीरंजनेय स्वामी डॉ
▪️गोटीपती रवि कुमार
▪️कंदुला दुर्गेश
▪️गुम्मदी संध्या राणी
▪️बीसी जनार्दन रेड्डी टी.जी. भरत
▪️एस. सविता
▪️वासमशेट्टी सुभाष
▪️कोंडापल्ली श्रीनिवास
▪️मंडीपल्ली रामप्रसाद रेड्डी

🔹️सोहळ्याला अनेक नेते उपस्थित-

▪️केंद्रीय मंत्री चिराग पासवान आणि राम मोहन नायडू देखील कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी केसरपल्ली आयटी पार्कमध्ये पोहोचले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस नेते प्रफुल पटेल यांनीही नायडूंच्या शपथविधी सोहळ्यात सहभाग घेतला. केंद्रीय मंत्री अमित शहा, जेपी नड्डा, जी किशन रेड्डी आणि माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही कार्यक्रमाला हजेरी लावली.

🔹️चिरंजीवीहीसह रजनीकांतची शपथविधी सोहळ्याला हजोरी-

▪️चित्रपट अभिनेता आणि ‘पद्मविभूषण’ पुरस्कार विजेते कोनिडेला चिरंजीवी आणि सुपरस्टार रजनीकांत, नंदामुरी बालकृष्ण आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम हे देखील या सोहळ्याला उपस्थित होते. याआधी मंगळवारी चंद्राबाबू नायडू यांची एनडीए विधिमंडळ पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली.

🔹️लोकसभा निवडणुकीत टीडीपीची उत्कृष्ट कामगिरी-

▪️नुकत्याच पार पडलेल्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत एनडीए आघाडीने चमकदार कामगिरी केली आणि राज्यातील १७५ पैकी १६४ जागा जिंकल्या आहेत. आघाडीचा भाग असलेल्या टीडीपीने सर्वाधिक १३५ जागा जिंकल्या होत्या, तर जनसेनेने २१ आणि भाजपाने ८ जागा जिंकल्या आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page