चंद्राबाबू नायडूंनी चौथ्यांदा घेतली आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ…

Spread the love

नवी दिल्ली : तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी (१२ जून) चौथ्यांदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. विजयवाडा येथील केसरपल्ली आयटी पार्क येथे झालेल्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि बंदी संजय कुमार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. अमित शाह आणि जेपी नड्डा मंगळवारी संध्याकाळीच या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी हैदराबादला पोहोचले होते.
चंद्राबाबू नायडू यांच्यानंतर जनसेना प्रमुख आणि अभिनेता पवन कल्याण यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्र्यांसह २३ मंत्री आहेत. टीडीपीचे १९, पवन कल्याणसह जनसेनेचे ३ आणि भाजपचा एक मंत्री आहे. एक पद रिक्त ठेवण्यात आले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page