*संगमेश्वर –* येणाऱ्या विधानसभेच्या पार्श्भूमीवर संघटनात्मक बांधणी व गाव भेट दौऱ्यासाठी भाजप रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष राजेश सावंत व चिपळूण संगमेश्वर मतदार संघ निवडणूक प्रमुख प्रमोद अधटराव यांनी चिपळूण तालुक्याचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांन सोबत दौरा केला या दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
चिपळूण ग्रामीण तालुक्याची कार्यकारणी व शहराची कार्यकारणी यांची बैठक घेऊन आगामी विधानसभे साठी सज्ज होण्याच्या सूचना जिल्हा अध्यक्ष राजेश सावंत यांनी दिल्या तर प्रमोद अधटराव यांनी येणाऱ्या विधान सभेला कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकतीने सामोरे जावे पक्ष आपल्या पाठी पूर्ण ताकदीने उभा राहील असे सांगितले.
संघटना अशी वाढवूया की पक्ष हि जागा आपल्याला लढवण्याची संधी देईल .राजकारणात काहीही होऊ शकते भविष्यातील आमदार भाजपाचाही असू शकतो असे सांगितले. त्या नंतर गाव भेट दरम्यान दसपटी गावातील श्री राम वरदायिनी मंदिराला भेट देऊन गावकऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर आई सुकाई देवी मंदिराला भेट देऊन आशिर्वाद घेतले.
या वेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.