विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! UPSC करणार परीक्षा पद्धतीत बदल; भुरट्या परिक्षार्थींवर एआयच्या मदतीनं ठेवणार लक्ष….

Spread the love

दरवर्षी UPSC CSE म्हणजेच नागरी सेवा परीक्षेसह १४ परीक्षा आयोजित करत असते. याशिवाय, उच्च सरकारी पदांसाठी भरती चाचणी आणि मुलाखत देखील भारतीय लोकसेवा आयोगा मार्फत आयोजित केली जाते

दरवर्षी UPSC CSE म्हणजेच नागरी सेवा परीक्षेसह १४ परीक्षा आयोजित करत असते. याशिवाय, उच्च सरकारी पदांसाठी भरती चाचणी आणि मुलाखत देखील भारतीय लोकसेवा आयोगा मार्फत आयोजित केली जाते.

UPSC म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोग सध्या मोठ्या निर्णयाच्या तयारीत आहेत. या निर्णयाचा देशातील लाखो स्पर्धा परीक्षा करणाऱ्या तरूणांवर होणार आहे. आयोग यूपीएससी परीक्षा पद्धतीत बदल करण्याच्या तयारीत आहे. मात्र, याबाबत अधिकृतपणे जाहिअर करण्यात आलेले नाही. पूजा खेडकर प्रकरणामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतांना हा निर्णय घेण्याच्या तयारीत आयोग असल्याचं म्हटलं जात आहे. परीक्षेतील फसवणूक आणि फसवणूक टाळण्यासाठी या पुढे यूपीएससी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्याची शक्यता आहे. यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), चेहऱ्याची ओळख यांसारख्या तंत्रज्ञानाचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे

भारतात प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोग दरवर्षी विविध परीक्षांचे आयोजन करत असते. तब्बल १४ परीक्षा या दरवर्षी घेतल्या जातात. सीएसई म्हणजेच नागरी सेवा परीक्षेचा यात प्रामुख्याने समावेश आहे. याशिवाय, उच्च सरकारी पदांसाठी भरती चाचणी आणि मुलाखतीचे आयोजन देखील यूपीएससी घेत असते.

या सुरक्षा पद्धतीचा होणार वापर
मीडिया रिपोर्ट्सनुसार, यूपीएससी आधार आधारित फिंगरप्रिंटिंगवरही विचार करत आहे. याशिवाय एआय तंत्रज्ञानाचा देखील वापर करण्याच्या विचारात आयोग आहे. सीसीटीव्ही, ई-ॲडमिट कार्डचे क्यूआर कोड स्कॅनिंग यांचाही या नव्या प्रणालीचा समावेश राहणार आहे. परीक्षेत उमेदवाराच्या जागी दूसरा डमी विद्यार्थी बसवून फसवून टाळण्यासाठी व आयोगाची प्रतिमा योग्य ठेवण्यासाठी हे पाऊल आयोग उचलण्याची शक्यता आहे.

सध्या, यूपीएससीने या नव्या बदलांसाठी निविदा मागवल्या आहेत. अशा सेवा देणाऱ्या कंपन्यांना वेळापत्रक, परीक्षा केंद्र आणि किती उमेदवार परीक्षेच्या दोन ते तीन आठवड्यांपूर्वी हजार राहतील, अशी माहिती निविदा कागदपत्रांमध्ये स्पष्ट करण्यास सांगितले असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार अशावेळी घडत आहे जेव्हा महाराष्ट्र केडरच्या आयएएस पूजा खेडकर यांच्या निवडीवरून लोकसेवा आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

UPSC म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोग सध्या मोठ्या निर्णयाच्या तयारीत आहेत. या निर्णयाचा देशातील लाखो स्पर्धा परीक्षा करणाऱ्या तरूणांवर होणार आहे. आयोग यूपीएससी परीक्षा पद्धतीत बदल करण्याच्या तयारीत आहे. मात्र, याबाबत अधिकृतपणे जाहिअर करण्यात आलेले नाही. पूजा खेडकर प्रकरणामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतांना हा निर्णय घेण्याच्या तयारीत आयोग असल्याचं म्हटलं जात आहे. परीक्षेतील फसवणूक आणि फसवणूक टाळण्यासाठी या पुढे यूपीएससी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्याची शक्यता आहे. यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), चेहऱ्याची ओळख यांसारख्या तंत्रज्ञानाचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे.

भारतात प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोग दरवर्षी विविध परीक्षांचे आयोजन करत असते. तब्बल १४ परीक्षा या दरवर्षी घेतल्या जातात. सीएसई म्हणजेच नागरी सेवा परीक्षेचा यात प्रामुख्याने समावेश आहे. याशिवाय, उच्च सरकारी पदांसाठी भरती चाचणी आणि मुलाखतीचे आयोजन देखील यूपीएससी घेत असते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page