संगमेश्वर /प्रतिनिधी- फुणगूस ग्रामपंचायत हद्दीतील घर क्रमांक 333/ अ ,ब क, हे आहे. सदर घराला कोणती परमिशन घेतल्याने व जमिनीचे मालक आम्ही असून घराला कोणती परमिशन आम्ही दिलेली नाही. त्यामुळे सदर घराला अनधिकृत शेरा असेसमेंट वर ठेवून मिळावा. ग्रामसेवकाच्या मनमानी कारभार व भोसले कुटुंबाला दिलेल्या त्रासाबद्दल त्यांच्यावर कारवाई करावी. व अनधिकृत घर तोडून मिळावे म्हणून भोसले कुटुंबीय आमरण उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसले होते. उपोषणाची दखल घेऊन उप कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे व त्यांच्या येथे झालेल्या बैठकीमध्ये पुढील सात दिवसांमध्ये ग्रामपंचायत तिने अर्जातील मुद्द्यावरती स्वयं स्पष्ट अहवाल सादर करण्याचे व त्यानंतर ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद यांच्याकडे सुनावणी घेऊन उपोषणातील मागण्यानुसार कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यामुळे भोसले कुटुंबाने आपले आमरण उपोषण स्थगित केले आहे.
सरपंच व तंटामुक्ती अध्यक्ष यांनी सकारात्मक कारवाई करण्याचे सदर मीटिंगमध्ये सांगितल्याने व ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद यांच्या सुनावणीवेळी मिळालेल्या आश्वासन मुळे सदरचे आमरण उपोषण मागे घेत असल्याचे प्रीतम भोसले यांनी सांगितले. जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपकार्यकारी अधिकारी देसाई साहेब यांनी कारवाई करण्याच्या आश्वासन दिल्यामुळे त्यांचे आम्ही भोसले कुटुंबीय आभारी आहोत. योग्य तो न्याय आम्हाला भेटेल अशी आशा आम्हाला आहे. आम्हाला सहकार्य करणाऱ्या पत्रकार बंधूंचेही आभार यावेळी प्रीतम भोसले यांनी मानले आहेत.