
संगमेश्वर : वार्ताहर – रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी येथील प्रतिष्ठित नागरिक श्री.अजय मयेकर यांच्या सुविद्य पत्नी सौ. अवंती अजय मयेकर संगमेश्वर नावडी येथे माहेर असलेल्या पूर्वाश्रमीच्या शर्मिष्ठा दिलीप कुचेकर या सध्या नायब तहसीलदार SRA पदावर बांद्रा पूर्व मुंबई येथे शासकीय सेवेत कार्यरत आहेत. शिंपणे उत्सव निमित्त नावडी येथे ग्रामदेवता दर्शनासाठी त्या गावी आल्या होत्या.
सन 1999 साली क्लर्क म्हणून कलेक्टर ऑफिस रत्नागिरी येथे शासकीय सेवेची सुरुवात केली. त्यानंतर संगमेश्वर, लांजा,चेंबूर, मुलुंड,बांद्रा इत्यादी तहसील मध्ये गेली 24 वर्ष सेवा बजावत आहेत.
त्यांचे माध्यमिक शिक्षण दादासाहेब सरफरे विद्यालय बुरंबी व पैसा फंड हायस्कूल येथे झाले. आई श्रीमती वैशाली दिलीप कुचेकर( निवृत्त शिक्षिका) व वडील कै. दिलीप कुचेकर व आजी आजोबा यांच्या संस्काराची जडणघडण व त्यांनी परिश्रमातून दिलेले शिक्षण याची जाणीव तसेच वरील अधिकारी पदावर काम करत असताना माणूस म्हणून जगणे.

छोटे खानी कार्यक्रमात मान्यवर म्हणून सत्कार करताना शाल, पुष्पगुच्छ, प्रमुख अतिथी नेहा संजय रेडीज (सहाय्यक कार्यक्रम अधिकारी) पंचायत समिती मंडळ सौ.सिद्धी पाथरे (महिला दक्षता कमिटी )सौ. शीतल सुर्वे( म.द. कमिटी ),निलेश कदम (विशेष कार्यकारी अधिकारी) सौ. पिसे आदी उपस्थित होत्या.
मयुरी कुचेकर, सौ.माधुरी कुचेकर (सहाय्यक शिक्षिका) सागर कुचेकर व परिवारातील मंडळी उपस्थित होते सत्काराचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते जनार्दन शिरगावकर व माजी सैनिक पाल्य दिनेश अंब्रे यांनी केले.

नायब तहसीलदार अवंती मयेकर यांच्या शुभहस्ते महिलांच्या समाजातील कामगिरीबद्दल प्रशंसापत्र शितल सुर्वे व माधुरी कुचेकर यांना प्रदान करून यावेळी सन्मान करण्यात आला. साप्ताहिक पोलीस तपास वार्तापत्र चे वरिष्ठ पत्रकार दिनेश अंब्रे यांच्या शुभहस्ते ‘ देव माणूस ‘ हा अंक देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी सौ. सिद्धी पाथरे, सामाजिक कार्यकर्ते जनार्दन शिरगावकर व श्रीमती शर्मिला कुचेकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते दिनेश अंब्रे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार दिनेश अंब्रे यांनी मानले.