
संगमेश्वर/ प्रतिनिधी- कोकणात शिमगोत्सव भारतीय संस्कृती, प्रथा व परंपरेनुसार मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा केला जातो. संगमेश्वरमध्ये निनावी देवीचा होळीकोत्सव हा आगळावेळा असतो, आनंद, उत्साहात आणि तेवढ्याच जल्लोषात ढोल ताशे तसेच पिपाणीच्या गजरात तल्लीन होऊन साजरा होतो. मुबंई-गोवा राष्ट्रीय महामार्गवरील संगमेश्वर एसटी बस स्थानकसमोरील महामार्गांवर तालासुरावर नाचून बालबालकांसह तरुण तरुणाई आपल्या मानकऱ्यांसमवेत समवेत माड हातावर झेलवत-झेलवत दोन्ही निनावी देवींच्या माडांची अनोखी भेट झाली. यावेळी गुलालाची उधळण फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली.
निनावी देवींच्या दोन माडांची विलोभनीय अचानक झालेली भेट पाहण्यासाठी महामार्गवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. डोळ्याचे पारणे फेडणारे दृष्य पाहून अनेकांना आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात फोटो तसेच विडिओ काढण्याचा मोह आवरता आला नाही. तसेच महामार्गवरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनातील प्रवाशांनीही आपली वाहने थांबून अनोख्या भेटीचा आंनद लुटला.
हुरारेहूरा.. आमच्या निनावी देवीचा… सोन्याचा तुरा रे…. अशा जयघोषात निघालेल्या दोन्ही माडांच्या अनोख्या भेटी दरम्यान महामार्गांवर उसळलेली गर्दी आणि वाहनांची वर्दळ सुरळीत ठेवण्यासाठी संगमेश्वर पोलीस उपनिरीक्षक शंकर नागरगोजे, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत शिंदे, पोलीस हेडकॉन्सटेबल विनय मनवळ,पोलीस हेडकॉन्सटेबल अरुण वानरे, वाहतूक पोलीस प्रमोद रामपुरे, रियाज मुजावर यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपअधीक्षक शिवप्रसाद पारवे यांच्या मार्गदर्शखाली विशेष मेहनत घेतली.