मुरलीधर मोहोळ मोदींच्या मंत्रिमंडळात:पहिल्यांदा खासदार होताच थेट केंद्रात संधी; कुस्तीपटू आता दिल्लीचा फड गाजवणार…

Spread the love

पुणे- पुणे लोकसभा मतदार संघातून पहिल्यांदा निवडून आलेले खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. त्यांचा मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. महाराष्ट्रातून आतापर्यंत नितीन गडकरी. पीयूष गोयल, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव. रामदास आठवले, मुरलीधर मोहोळ यांना फोन आले आहे.

कुस्तीतून राजकीय आखाड्यात…

मुळशी तालुक्‍यातील मुठा गावातील किसनराव मोहोळ यांचे कुटुंब नोकरी आणि मुलांच्या शिक्षणासाठी साधारणपणे 1985 च्या सुमाराला पुण्यातील कोथरुडमध्ये आले. ज्यात मुरलीधर मोहोळ यांच्यासह तीन भावंडे. या तिघांचे शिक्षण प्राथमिक शिक्षण मूळ गावी झाले. त्यातले धाकटे मुरलीधर मोहोळ. त्यांनी भावे स्कूलमधून दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. मोहोळ कुटुंबाला तशी पहिलवानकीची पार्श्‍वभूमी. पुण्यातील खालकर आणि निंबाळकर तालमीनंतर कुस्तीसाठी मुरलीधर मोहोळ हे कोल्हापुरला गेले आणि तिथेच पदवीपर्यंतचे (कला शाखा) शिक्षण पूर्ण केले. शिवाजी विद्यापीठात शिकत असतानाच ते कसबा बावड्यातील शासकीय कुस्ती केंद्राच्या आखाड्यात उतरले. याच काळात त्यांनी आंतरमहाविद्यालयीन आणि राष्ट्रीय स्तरावरच्या आखाड्यापर्यंत मजल मारली. त्यानंतर कॉलेज संपवून ते 1996 च्या सुमारास पुण्यात परतले. तेव्हा कुस्तीचा नाद सोडून ते राजकीय आखाड्याकडे अधिक वळले.

मोहोळांची राजकीय कारकीर्द?…

  • पुणे महानगरपालिकेचा सभासद म्हणून चार वेळा विजयी 2002, 2007, 2012 आणि 2017 झाले आहेत – 2019- 2022 मध्ये पुणे महानगर पालिकेचे महापौर होते.
  • 2009 मध्ये खडकवासला (पुणे) मतदारसंघातून निवडणुकीसाठी उमेदवार
  • 2019- 2022 मध्ये पुणे महानगर पालिकेचे महापौर होते.
  • उपाध्यक्ष, अखिल भारतीय महापौर परिषद
  • पुणे महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्ष 2017-2018
  • संचालक, पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएससीडीसीएल) -2017-2018
  • संचालक, पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) 2017-2018
  • सभासद, पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) 2017-2018

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page