
संगमेश्वर l 09 जून- संगमेश्वर तालुक्यातील वाळू, माती उत्खनन मोठ्या प्रमाणात होत असून यात संबंधित अधिकारी काही राजकीय पुढाऱ्यांचा वरदहस्त असल्याचे बोलले जात असून त्यांचे काही कार्यकर्त्यांचा हा व्यवसाय असल्याने तक्रारदारानी पुरावे देऊनही त्यांचेवर कार्यवाही केली जात नसल्याचे चित्र आहे. रोज वाळू व माती उत्खनन व वाहतूक होत असून सह्याद्री नगर, साडवली येथील सी सी टिव्ही फुटेज व इतर ठिकाणचे फुटेज तपासण्यासाठी मागणी करण्यात येणार असून त्यामध्ये छेडाछेडी होण्याचा संभव असल्याचेही स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.


करजुवे पासून मागणी पर्यं
याबाबत माहिती देताना सामाजिक कार्यकर्ते व माहितीचा अधिकार कार्यकर्ता फेडरेशन चे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मनोहर गुरव यांनी सांगितले की, दिनांक 05 जून 24 रोजी रात्री 08.37 वाजता संगमेश्वर ते साखरपा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक सुरू असल्याचे फोटो व व्हिडिओ आमच्याकडे प्राप्त झाले आहेत. मात्र सदर पुरावे स्थानिक अधिकारी यांना सादर न करता मुख्यमंत्री महोदय व महसूल मंत्री महोदयांना पाठविण्यात येणार आहेत. विविध विभागात हप्ते सुरू असल्याने तरी चूप मेरी चूप चे धोरण अवलंबिले असल्याने वाळू उपसा, वाळू वाहतूक, वाळू साठा होत असल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्यात अनेक बांधकामे सुरू असून वाळू कुठून येते, कोठे जाते, याची तपासणी का होत नाही. आलेले पुरावे, केलेल्या तक्रारीनुसार अधिकारी यांचेवर शासकीय कर्तव्यात कसूर व दप्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत पुढील सनदशील मार्ग अवलंबविला जाणार असल्याचे गुरव यांनी सांगितले.
आपण याबाबत मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री यांना याबाबत पुराव्यासह माहिती देण्यात येणार असून त्यांची सखोल चौकशी करून शासनाचा महसूल बुडविणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच याप्रमाणे अनेक विभागातील अधिकारी यांचे विरोधात जनतेच्या विविध ज्वलंत प्रश्नांवर कोणतीही कार्यवाही होत नसल्याने आपण दिनांक 15 ऑगस्ट 24 रोजी स्वातंत्र्य दिनी उपोषण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


