लिटिल स्टार प्री स्कूल नावडी संगमेश्वर येथील वार्षिक स्नेहसंमेलन विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात!

Spread the love

संगमेश्वर : संगमेश्वर बाजारपेठ येथे असलेल्या लिटिल स्टार स्कूलमध्ये दरवर्षीप्रमाणे वार्षिक स्नेहसंमेलनाचा महोत्सव केवळ औपचारिकता नाही तर आपल्यामधील प्रेम विश्वास आणि आपुलकी प्रदर्शित करणारी आहे. त्यासाठी आपण सर्वजण एकत्र जमलो आहोत. सर्वाच्या योगदानामुळे या स्नेहसंमेलनाचे आयोजन यशस्वी असे प्रतिपादन श्री लिटिल स्टार प्री स्कुल संचालक श्री धनाजी भांगे यांनी केले.लिटिल स्टार प्री स्कुल वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी बोलत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष.पोलीस निरिक्षक- श्री अमित यादव तर प्रमुख पाहुणे श्री. अमोल धाडगे- कर अधिकारी, श्री. रत्नसार ढगारे- कस्टम अधिकारी रत्नागिरी विशेष उपस्थिती, प्रज्ञा कोळवणकर -सरपंच,विवेक शेरे- उपसरपंच उपसरपंच,युयुस्तू आर्ते -सामाजिक कार्यकर्ते , शंकर नागरगोजे- पोलीस उपनिरिक्षक संगमेश्वर,श्री बापू भिंगार्डे  -व्यापारी अध्यक्ष संगमेश्वर बाजारपेठ,प्रमोद दादा शेट्ये -जेष्ठ नागरिक अध्यक्ष, श्री समीर अत्तार प्रचितगड माध्यमिक विद्यालय कारभाटले, ज्येष्ठ नागरिक  उदय संसारे –  सामाजिक कार्यकर्ते  दिनेश अंब्रे, संजय शिंदे पालक प्रतिनिधी, उपस्थित पालक, ग्रामस्थ,आजी माजी विद्यार्थी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे उदघाटक  कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस निरीक्षक श्री. अमित यादव यांनी श्रीफळ वाढवुन केले तर दिपप्रज्वलन व झाडाला पाणी घालून पाहुण्यांच्या उपस्थितीत झाले. यानंतर मंचावरील उपस्थित मान्यवरांचा सत्कार झाला.



शाळेचे संचालक श्री धनाजी भांगे प्रास्ताविक यांनी केले. प्रास्ताविक प्रसंगी लिटिल स्टार प्री स्कुलची  ख्याती सांगण्यात आली. लिटिल स्टार प्री स्कुल मध्ये विध्यार्थी हा केंद्रबिंदू मानून वर्षभर अंगी असणारे सुप्त गुण,शिक्षण, कला, क्रीडा , सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा घेतल्या जातात.यांतील विविध कलागुणात विविध विद्यार्थ्यानी  विशेष यशसंपादन केले. या विध्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत गुणगौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अमित यादव यांनी उपस्थित पालकांना शिक्षणाविषयीं मार्गदर्शन केले.

प्रमुख पाहुणे,  मान्यवरांचे मनोगते झाली.व बालकांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे गुणप्रदर्शन यात बाल गीत,  कोळीगीत,लावणी,रिमिक्स गाणी,आजच्या या विज्ञानयुगात नाटक आई वडिलांना अनाथ आश्रमात सोडतात व त्यांचं पालन पोषण करत नाहीत. यांचे खास आकर्षण फातिमा मेमन, रिहाश दाभाडे, श्रीनेश भाटकर यांनी नाटिका सादर केली.अशा विविध कलागुणांचा अविष्कार उपस्थित रसिक प्रेक्षकांना ग्रामस्थ पालक यांना यांच्या उपस्थित झाला. रसिक प्रेक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांची दखल घेऊन बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.    
               
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कडवई येथील मरीयम जुबळे या विद्यार्थीने तर हा संपुर्ण कार्यक्रमाचे नियोजन आयोजक श्री. लिटिल स्टार प्री स्कुल मुख्याध्यापिका राजश्री धनाजी भांगे शिक्षिका अकसा मुल्ला मदतनीस म्हणून मीरा रहाटे काकी यांनी अथक परिश्रम व मेहनत घेऊन कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडला. या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या सौ. सिद्धी पाथरे यांनी शारदा ग्रंथालय वाचनालय  अंतर्गत वाचन चळवळ उपक्रम घेऊन फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आली.व यात गुणवान विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसांचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमात गणेश प्रासादिक मंडळ संगमेश्वर यांनी रंगमंच उपलब्ध करुन दिला. Youtuber Live कार्यकम घेण्यासाठी तंत्रस्नेही शिक्षक श्री.शिवप्रसाद गड्डमवार, श्री.आनंद देशपांडे यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page