बालमनासाठी संस्कार व व्यक्तीमत्वाबरोबर,वैज्ञानिकदृष्टीकोन जोपासणे  म्हणून हे शिबीर योग्यच!-पो.नि.अमित यादव….गोळवलकर गुरूजी प्रकल्प स्थळीव्यक्तीमत्व शिबीराचा समारोप!

Spread the love

श्रीकृष्ण खातू  / धामणी – संगमेश्वर तालुक्यातील गोळवली येथे गोळवलकर गुरुजी प्रकल्प स्थळी आयोजित केलेले व्यक्तिमत्व शिबिर हे बालमनासाठी संस्कार व्यक्तिमत्व विकासाबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्यासाठी  एकदम योग्यच असून मिळालेले नवीन प्रत्येक बाल मित्रांनी लक्षात ठेवून याचा उपयोग नासा इस्त्रो सारख्या परीक्षेसाठी करून आपण आपल्या शाळेतून  छोटे वैज्ञानिक निर्माण व्हावेत व खऱ्या अर्थाने या फिरत्या विज्ञान प्रयोग शाळेचे नाव लौकिक करावे अशा प्रकारचे मार्गदर्शनपर उदगार समारोपाचे प्रमुख पाहुणे संगमेश्वर पोलीस स्टेशनचे प्रभावी व कुशल नेतृत्व असणारे पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी शिबिर समारोप प्रसंगी काढले.

        
दोन दिवस चाललेल्या या व्यक्तिमत्व शिबिरात व्यक्तिमत्व विकास, कार्यानुभवातून विविध फुले,गणितातील गमती जमती,  अनेक क्लुप्त्या,  मनोरंजनात्मक खेळ,विज्ञानाच्या कथा ,व    आधुनिक तंत्रज्ञान, डॉक्टर भगवान नारकर यांची  ” तहान ”     नावाची  व  “व्यथा” नावाची चित्रफीत,सूर्यनमस्कार,व्यायाम      प्रकार, मैदानी खेळ, देशभक्ती,  लोकशाही स्थापक छत्रपती    शिवराय व जिजामाता, स्वामी विवेकानंद ,या अशा अनेक     विषयावर      नियोजित मार्गदर्शकांनी  माहितीतून सखोल     मार्गदर्शन केले.
 
     
तसेच मंचावर उपस्थित असलेले कडवई येथिल सुप्रसिध्द अभिनेते व डाॅ. भगवान नारकर,सेवा भारती कोकण प्रांत ट्रस्टचे उपाध्यक्ष अविनाश धाट,  रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष दीपक देवल ,जिल्हा  सचिव मंदार जोशी,  जिल्हा सहसचिव श्रीधर दळवी , यांनी आपल्या मनोगतातून मौलीक मार्गदर्शन विद्यार्थी वर्गाला प्रोत्साहीत केले.

       
तसेच सायंकाळी भारतमाता पूजन कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी यासाठी सर्वजण एकरूप झाले होते. भारत माता पूजनासंबंधी  वक्ते,व माखजन हायस्कुलचे प्रयोग शाळा सहाय्यक सचिन साठे यांनी मन,मनगट,व मेंदू यांच्याशी प्रत्येकाने साम्य ठेऊन आपण आपल्या भारत मातेचे म्हणजेच काळीआई,मातीचे जीवापाड रक्षण केले पाहिजे, व हे प्रत्येकाने आपले कर्तव्य समजले पाहिजे.अशा प्रकारे सखोल  मार्गदर्शन करुन उपस्थितांना भारावून टाकले.

हे शिबीर यशस्वी होण्यासाठी विनायक पाध्ये, अजिंक्य पावसकर, दिलीप काजवे, केतकी पाध्ये, प्रकाश पोंक्षे, प्रमोद बापट, अरूण  सरदेसाई, मधुरा सरदेसाई,आदिती काजवे, दिनेश नाटेकर,कोकण प्रांत विषय प्रमुख  हेमंत आहीर , आरोग्य आयाम प्रमुख राजेंद्र जोशी,जिल्हा सचिव मंदार जोशी,कार्यालय प्रमुख संजय काटदरे,रविंद्र  खांडेकर ,शाळांचे शिक्षक, विद्यार्थी, स्वयंसेवक  यांनी खूप परिश्रम घेतले.
         

शेवटी उपस्थितांचे , मदतकर्त्यांचे प्रकल्प व्यवस्थापक, चंद्रशेखर देशपांडे, वनिता देशपांडे यांच्या विशेष सहकार्याबद्दल  अजिंक्य पावसकर  यांनी आभार मानले. व प्रार्थनेने शिबीराची सांगता करण्यात आली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page