
श्रीकृष्ण खातू /धामणी– महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना तालुका शाखा संगमेश्वरच्या वतीने शिष्यवृत्ती मध्ये गुणवंत विद्यार्थी ,आदर्श शिक्षक, आदर्श शाळा, मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा , सेट/नेट परीक्षा उ्तीर्ण शिक्षक अशा विविध गुणवंत व शाळांचा सत्कार समारंभ नुकताच पंचायत समिती सभागृह, देवरुख या ठिकाणी संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून झाले.यावेळी दिवंगत देशातील मान्यवर, दिवंगत पेन्शन शिलेदार शिक्षक या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली . सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ व छोटीसी भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक तालुका अध्यक्ष अमोल वाघमोडे त्यांनी केले. यात संघटनेने केलेलं सामाजिक काम रक्तदान शिबिर सहभाग, पूरग्रस्त बांधवांना मदत, व विद्यार्थ्यांच्या यशाचं कौतुक करून त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी गुण गौरव सोहळा याची महिती दिली..विद्यार्थ्यानी भविष्यात MPSC मधुन अधिकारी व्हावे अशी सदिच्छा व्यक्त केली..
त्यानंतर आदर्श शिक्षक श्री वाडेकर , श्री डावरे तंत्रस्नेही शिक्षक नारायण शिंदे, शिवप्रसाद गड्डमवर , विनया भोसले, संदेश झेपले यांना विशेष प्राविण्य बद्दल सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
तसेच आदर्श शाळा साखरपा कन्या व हरपुडे या शाळांचा सन्मान करण्यात आला.त्यानंतर मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानात सन २०२३/२४ व २०२४/ २५ या दोन्ही वर्षातील विजेत्या शाळांचा आकर्षक शिल्ड देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
इयत्ता पाचवी नवोदय, शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच इयत्ता आठवीतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सन्मानही करण्यात आला.
या कार्यक्रमाला श्री.पंडित रावसाहेब पुरवठा अधिकारी तथा नायब तहसिलदार, तसेच महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे संचालक तथा जिल्हाध्यक्ष श्री अंकुश चांगण,जिल्हा सचिव दत्तात्रय क्षिरसागर, उपाध्यक्ष महादेव बंडगर, अजित पाटील, पदवीधर संघटनेचे अध्यक्ष करंबेळे सर , प्रोटॉन संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदेश कदम, कास्ट्राईब संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रमोद पवार , तसेच बहुसंख्येने पेन्शन शिलेदार, विद्यार्थी पालक उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष अंकुश चांगण यांनी संघटनेचा इतिहास व संघटना करत असलेले काम सर्वांसमोर सांगितले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुकाध्यक्ष अमोल वाघमोडे, उपाध्यक्ष कारभारी वाडेकर, सचिव बबन सांगळे, कार्याध्यक्ष आदम सय्यद ,कोषाध्यक्ष श्याम पवार, सहसचिव सुरेश माने,जिल्हा प्रतिनिधी हणमंत पाटील, रूपेश किर्वे जिल्हा संघटक व महिला आघाडी प्रमुख वेदिका शेलार, सुषमा पंदेरे उपाध्यक्षा तसेच सर्व तालुका कार्यकारिणीने व पेन्शन शिलेदार यांनी योग्य नियोजन करून कार्यक्रम यशस्वी केला.
या कार्यक्रमासाठी शिक्षक राहूल इंगळे यांनी अतिशय सुंदर रांगोळी साकारली होती. महिला आघाडीच्या वतीने सर्व महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ यावेळी घेण्यात आला. तिळगुळ देऊन सर्वांना संक्रातीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. सदर कार्यक्रमाचे यशस्वी सुत्र संचालन संदेश झेपले व बबन सांगळे यांनी केले..