राहुल नार्वेकरांवर अलिबागकर भडकले! अलिबागचे नाव बदलण्याची गरज नसल्याच्या प्रतिक्रिया…

Spread the love

अलिबाग | अलिबागचे नाव बदलून मायनाक नगरी करावे अशी शिफारस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्यामुळे अलिबागकर चांगलेच भडकल्याचे पहायला मिळाले. अनेकांनी आपला राग सोशल मीडियावर व्यक्त करताना अलिबागचे नाव बदलण्याची काहीही गरज नसल्याचे सुनावले आहे.

भंडारी समाजाच्या मूळ मागणीला नार्वेकर यांनी शिफारसपत्र जोडले, त्यामुळे त्यांना रोषाला सामोरे जावे लागत आहे.अलिबागचे नाव बदलून कधीकाळी श्रीबाग करण्याची मागणी होत असते. अलिबागचे आंग्रेनगर असे नामांतर करा अशीही मागणी होते. यात आता मायनाक नगरीची भर पडली आहे.

अलिबाग येथील खांदेरी-उंदेरी बंदरावरील किल्ला आणि तेथील मायनाक भंडारी यांचा पराक्रम, चिवट संघर्ष यापुढे इंग्रजांना देखील माघार घ्यावी लागली होती. स्वराज्याचे आरमार आणि मायनाक भंडारी यांच्या या पराक्रमाचा ऐतिहासिक संदर्भ घेता अलिबाग शहरासह तालुक्याचे मायनाक नगरी असे नामकरण करण्यात यावे अशी मुळची मागणी अखिल भारतीय भंडारी महासंघाने केली आहे.

भंडारी समाजाच्या या मागणीला विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर यांनी शिफारसपत्र जोडून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले होते. या पत्रात त्यांनी अलिबागचे नाव मायनाक नगरी असे करण्याची मागणी योग्यच असल्याचे म्हटले होते. मात्र यानंतर अलिबागमध्ये वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. गुरुवारी सोशल मीडियावर अनेकांनी या मागणीला विरोध केला.

अलिबागचा विकास कसा होईल याकडे नार्वेकरांनी लक्ष द्यावे. नाव बदलून काही साध्य होणार नाही, अलिबाग तालुक्यातील रस्ते, पाणी आणि इतर नागरी सुविधांसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, हे नको ते विषय निवडणूका आल्या की सगळे काढतात असेही असे त्यांना सुनावण्यात आले आहे. कोणीही मागणी केलेली नसताना अलिबागचे नाव बदलायला हवे कशाला? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

दरम्यान, अलिबागचे नाव बदलायचे का? अशा स्वरुपाचा सोशल मिडीयावर एक ओपिनीयन पोल देखील घेण्यात आला, या पोलवर देखील ९२ टक्के लोकांनी नाव बदलण्यास नकार दर्शवली आहे. ७ टक्के लोकांनी नामांतर करावे असे सुचवलेे होते. तर एक टक्का लोक तटस्थ राहील्याचे दिसून आले.

त्यामुळे राहूल नार्वेकरांनी केलेली मागणी शासन दरबारी रेटतात की कुठल्या तरी दप्तरात पडून राहते हे येत्या काळात दिसून येईल. दरम्यान, भाजपच्या काही पदाधिकार्‍यांनी नार्वेकरांच्या मागणीचे समर्थनही केले आहे.

अलिबागचे नाव बदलून कधीकाळी श्रीबाग करण्याची मागणी होत असते. अलिबागचे आंग्रेनगर असे नामांतर करा अशीही मागणी होते. यात आता मायनाक नगरीची भर पडली आहे.

अलिबाग येथील खांदेरी-उंदेरी बंदरावरील किल्ला आणि तेथील मायनाक भंडारी यांचा पराक्रम, चिवट संघर्ष यापुढे इंग्रजांना देखील माघार घ्यावी लागली होती. स्वराज्याचे आरमार आणि मायनाक भंडारी यांच्या या पराक्रमाचा ऐतिहासिक संदर्भ घेता अलिबाग शहरासह तालुक्याचे मायनाक नगरी असे नामकरण करण्यात यावे अशी मुळची मागणी अखिल भारतीय भंडारी महासंघाने केली आहे.

भंडारी समाजाच्या या मागणीला विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर यांनी शिफारसपत्र जोडून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले होते. या पत्रात त्यांनी अलिबागचे नाव मायनाक नगरी असे करण्याची मागणी योग्यच असल्याचे म्हटले होते. मात्र यानंतर अलिबागमध्ये वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. गुरुवारी सोशल मीडियावर अनेकांनी या मागणीला विरोध केला.

अलिबागचा विकास कसा होईल याकडे नार्वेकरांनी लक्ष द्यावे. नाव बदलून काही साध्य होणार नाही, अलिबाग तालुक्यातील रस्ते, पाणी आणि इतर नागरी सुविधांसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, हे नको ते विषय निवडणूका आल्या की सगळे काढतात असेही असे त्यांना सुनावण्यात आले आहे. कोणीही मागणी केलेली नसताना अलिबागचे नाव बदलायला हवे कशाला? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

दरम्यान, अलिबागचे नाव बदलायचे का? अशा स्वरुपाचा सोशल मिडीयावर एक ओपिनीयन पोल देखील घेण्यात आला, या पोलवर देखील ९२ टक्के लोकांनी नाव बदलण्यास नकार दर्शवली आहे. ७ टक्के लोकांनी नामांतर करावे असे सुचवलेे होते. तर एक टक्का लोक तटस्थ राहील्याचे दिसून आले. त्यामुळे राहूल नार्वेकरांनी केलेली मागणी शासन दरबारी रेटतात की कुठल्या तरी दप्तरात पडून राहते हे येत्या काळात दिसून येईल. दरम्यान, भाजपच्या काही पदाधिकार्‍यांनी नार्वेकरांच्या मागणीचे समर्थनही केले आहे.

Author

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page