कलम 370 हटवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच काश्मीरला देणार भेट, विविध कामांचे करणार उद्घाटन…

Spread the love

लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज श्रीनगर दौऱ्यावर जाणार आहेत. कलम 370 हटवल्यानंतर पंतप्रधानांचा हा पहिलाच काश्मीर दौरा आहे. श्रीनगरमध्ये त्यांची जाहीर सभा होणार आहे. मोदींच्या दौऱ्यात श्रीनगरमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

श्रीनगर- जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीरमध्ये दाखल होणार आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्या हा महत्त्वपूर्ण दौरा असणार आहे. बक्षी स्टेडियमवर ‘विकसित भारत, विकसित जम्मू काश्मीर’ या कार्यक्रमात मोदी सहभागी होणार आहेत. त्यामुळं मोदींचा दौरा लोकसभा निवडणुकीपूर्वी महत्वाचा मानला जात आहे.

‘दहशतवादाची राजधानी’ झाली पर्यटन राजधानी : पंतप्रधान मोदींच्या आगमनापूर्वी भाजपाचे ज्येष्ठ नेते तरुण चुग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरला भारताची ‘पर्यटन राजधानी’ बनवलं, असं वक्तव्य केलंय. जम्मू काश्मीर आगोदर ‘दहशतवादाची राजधानी’ होती, ती आता पर्यटन राजधानी बनल्याचं चुग यांनी सांगितलं. बक्षी स्टेडियमवर पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेच्या तयारीची पाहणी करण्यासाठी ते श्रीनगरमध्ये आले होते. जम्मू-काश्मीरमध्ये आता सर्वांगीण विकास होत असल्याचंही चुग म्हणाले.

विविध विकासकामांचं करणार उद्घाटनं…

‘विकसित भारत विकसित जम्मू काश्मीर’ या कार्यक्रमात मोदी केंद्रशासित प्रदेशातील कृषी-अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी 5 हजार कोटी रुपयांचा ‘संपूर्ण कृषी विकास कार्यक्रम’ समर्पित करणार आहेत. याशिवाय, ते श्रीनगरमधील ‘हजरतबल श्राइनचा एकात्मिक विकास’ यासह पर्यटन क्षेत्रात 1 हजार 400 कोटींहून अधिक विकासकामांचा शुभारंभ करणार आहेत.

श्रीनगरमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था…

पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींच्या श्रीनगरमधील मुक्कामादरम्यान सर्व मार्गांवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्या दौऱ्यादरम्यान अनेक ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. पाळत ठेवण्यासाठी ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर केला जात आहे. तर घटनास्थळाच्या सभोवतालच्या दोन किलोमीटरच्या परिघात सुरक्षा दलांकडून पायी गस्त वाढवण्यात आली आहे. तसंच झेलम नदी, दल सरोवरात मरीन कमांडो तैनात करण्यात आले आहेत.

श्रीनगरमध्ये ड्रोन उडवण्यावर तात्पुरती बंदी….

मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीनगर शहरात ड्रोन उडवण्यावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे, असं पोलिसांनी सांगितलंय. पंतप्रधानांचा ताफा येणाऱ्या मार्गावरील सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहेत. याशिवाय गुरुवारी होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षा पुढं ढकलण्यात आल्या आहेत. स्थानिक भाजपा नेत्यांच्या मते, 2019 मध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर पंतप्रधान मोदींच्या पहिल्या रॅलीला सुमारे एक लाख लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page