तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदा परदेश दौऱ्यावर! जी-7 परिषदेमध्ये होणार सहभागी!..

Spread the love

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदींनी ९ जून रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यावेळी एनडीएमधील काही नेत्यांनीही मंत्रि‍पदाची शपथ घेतली. त्यानंतर एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी परदेश दौऱ्यावर रवाना होणार आहेत. तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच परदेश दौरा असून ते इटलीला जाणार आहेत. इटलीमध्ये जी ७ शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आलेले असून या शिखर परिषदेमध्ये ते सहभागी होणार आहेत.

इटलीमध्ये १४ ते १५ जून या कालावधीत जी ७ शिखर परिषद पार पडणार आहे. या परिषदेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह आदी महत्वाचे नेते या शिखर परिषदेला उपस्थित असणार आहेत. या शिखर परिषदेमध्ये जागतिक पातळीवरील काही महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page