
श्रीकृष्ण खातू/ संगमेश्वर प्रतिनिधी- तीव्र कुपोषण, मध्यम कुपोषण,होऊ न देता मातेचे दूध, योग्य आहार,बालकाचे आवश्यक असणारे लसीकरण,त्याच्या आरोग्याची काळजी, बालकाच्या विकासाचे जे टप्पे आहेत, त्या टप्प्यानुसार बालकांचे पालन पोषण म्हणजेच बालकासाठी नव चेतना कार्यक्रम एकात्मिक बालविकास प्रकल्पा अंतर्गत राबवला जात असून प्रत्येक पालकाने आपल्या सजगपणे लक्ष देणे गरजेचे असून बेटी बचाओ बेटी पढाओ या अंतर्गत लेक लाडकी या योजनेचा अवश्य लाभ घेऊन मुलीच्य आरोग्याकडे विशेष लक्ष द्या अशा प्रकारचे सखोल मार्गदर्शन जिल्हास्तरावरून आयसीडीएस व टी एच आर एस अंतर्गत नियुक्त असलेल्या अंकिता लोखंडे यांनी उपस्थितांना केले.

एकात्मिक बाल विकास प्रकल्प फुणगुस अंतर्गत अंगणवाडी केंद्र कोंडअसुर्डे येथे नव चेतना कार्यक्रम अंतर्गत शून्य ते तीन वर्ष्याची मुले व माता पालक यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाचा मुख्य हेतू पर्यवेक्षक रेश्मा सासने यांनी स्पष्टीकरणाने उपस्थितांना पटवून देतांना कोणताही भेद भाव न करता मुलगी दोन्ही घरांना जोडणारा एक दुवा असून, शासन स्तरावरून वरून प्राप्त झालेल्या योजना मुलींसाठी अवगत करून घ्या व त्याचा लाभ मिळवून मुलीला आरोग्य संपन्न बनवा असे नमूद केले.
याप्रसंगी जनजागृतीसाठी प्रभात फेरी काढण्यात आली. व बालकाच्या आरोग्याच्या दृष्टीने आलेल्या पौष्टिक आहाराच्या स्टॉल प्रदर्शनाची पाहणी करून ” बेटी बचाओ बेटी पढाओ” :अंतर्गत ‘लेक लाडकी’ याचा लाभ घेणाऱ्या हिंदवी मुंडेकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी कोंडसुडेचे उपसरपंच कृष्णा डावल, ग्रामसेवक रोशन जाधव, सामाजिक कार्यकर्ते संजय शिंदे यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी मंचावर उपसरपंच कृष्णा डावल, ग्रामसेवक रोशन जाधव, सामाजिक कार्यकर्ते संजय शिंदे ग्रामपंचायत सदस्य अंकिता शिंदे पर्यवेक्षिका पाटील अंकिता लोखंडे माता पालकवर्ग आशा सेविका, इतर अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.
या मेळाव्याचे नियोजनासाठी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी वंदना यादव यांचे मार्गदर्शन लाभले. येथील व्यवस्थापन अंगणवाडी सेविका सुजाता शिंदे व मदतनीस सुनिता शिंदे यांनी केले होतें.