मंडगणड (प्रतिनिधिी): येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरण – 2020 अंतर्गत एबीसीआयडी काढण्यासंदर्भात विध्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहूल जाधव उपस्थित होते.
यावेळी उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, एबीसीआयडी समिती समन्वयक डॉ. धनपाल कांबळे, प्रा. संजयकुमार इंगोले, डॉ. भरतकुमार सोलापुरे, डॉ. संगीता घाडगे, डॉ.शैलेश भैसारे, डॉ. महेश कुलकर्णी, डॉ. सुरज बुलाखे, प्रा. प्रितेश जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. शैलेश भैसारे यांनी उपस्थित मान्यवरांचे शब्दसुमानाने स्वागत करुन कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात एबीसीआयडी काढण्याविशयी थोडक्यात माहिती दिली. तर डॉ.. महेश कुलकर्णी यांनी विध्यार्थ्यांनां प्रात्यक्षिकाव्दारे एबीसीआयडी काढण्याचे प्रशिक्षण दिले.
यावेळी मार्गदर्शक म्हणून बोलताना प्राचार्य डॉ. राहूल जाधव यांनी सांगितले की, चालू शैक्षणिक वर्षात प्रथम वर्षातील विध्यार्थ्यांनां नवीन शैक्षणिक धोरण – 2020 लागू झाले आहे. या अंतर्गत प्रत्येक विध्यार्थ्यांनी बॅंकांप्रमाणेच अॅकॅडेमिक बॅंक क्रीडीट काढणे गरजेचे आहे. विद्यापीठीय परीक्षेत मिळालेले गुण हे विध्यार्थ्यांच्या अॅकॅडेमिक बॅंक क्रीडीट मध्ये जमा होणार आहेत. त्याशिवाय विध्यार्थ्यांनां निकाल कळणार नाही. तसेच इतर महाविद्यालयातील अथवा विद्यापीठातील एखादा कोर्स करण्याकरिता कागदी गुणपत्रक देण्याची गरज पडणार नाही. महाविद्यालय व्यतिरिक्त विध्यार्थ्यांनी दुसरा कोणताही कोर्स केल्यास त्याचे मिळणारे क्रीडीट हे त्याच्या एबीसीआयडी खात्यात जमा होणार आहेत. त्याकरिता सर्व विध्यार्थ्यांनी एबीसीआयडी उघडणे आवश्यक आहे.
कार्यक्रमास सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शैलेश भैसारे यांनी तर शेवटी आभार डॉ. सुरज बुलाखे यांनी मानले.