संगमेश्वर प्रतिनिधी – अखंड महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेले रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर तीर्थ क्षेञ हे स्वयंभू देवस्थान आहे , गतवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा श्री देव मार्लेश्वराचा याञोत्सव १३ आणि १४ जानेवारीला मकर संक्रातीला मोठ्या थाटामाटात संपन्न होणार असून त्याच अनुषंगाने संगमेश्वर तालुक्याच्या तहसिलदार श्रीमती अमृता साबळे यांनी आज दिनांक ६ जानेवारी रोजी तहसिलदार कार्यालय येथे आढावा बैठक घेतली
त्या बैठकीत महत्वाच्या मुद्द्यांवर सर्व शासकीय विभागांशी चर्चा केली व सर्व विभागांना योग्य त्या सुचना करुन उपाय योजना करण्यास सांगीतले जेणे करुन येणारया भाविकांना कुठल्याही प्रकारचा ञास होऊ नये याची विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे ….संगमेश्वर तालुक्यातील सर्वांसाठीच हे देवस्थान प्रार्थनीय आहेच असे त्यांनी यावेळी ऊपस्थित सर्वांना संबोधित केले व सर्व विभागांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले ….
सदरच्या बैठकीला निवासी नायब तहसिलदार श्री सुरेश गोताड , देवरुख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री अतुल जाधव यांच्या अधिपत्याखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मुजावर आणि त्यांचे सहकारी म्हावळणकर , पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी श्री विनोदकुमार शिंदे , महावितरणचे – श्री गायकवाड , सार्वजनिक बांधकाम विभाग , आरोग्य विभाग , एस टी विभाग , मारळ सजाचे मंडळ अधिकारी श्री फाटक , तलाठी – श्रीमती तांबे , मारळचे पोलीस पाटील – श्री देवदास सावंत, श्री मार्लेश्वर देवस्थान ट्रस्ट समितीचे अध्यक्ष श्री महादेव लिंगायत व कमिटी, मारळ निवधे गृप ग्रामपंचातीच्या सरपंच – मंगला गुरव , ग्रामसेवक – जयदीप जाधव , कोतवाल – आशिष धावडे व श्री क्षेञविकास ट्रस्ट मंडळ उपस्थित होते