संगमेश्वर/ प्रतिनिधी- संगमेश्वर तालुका हा शांत तालुका आहे. पोलिस रेंजिग डे निमित्ताने संगमेश्वर पोलीस ठाणेने आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धेला येथील जनतेने उस्फुर्त प्रतिसाद हे पाहून आनंद होत असल्याचे प्रतिपादन रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले. संगमेश्वर तालुक्याचे कबड्डी प्रेम पाहून आनंद झाला असल्याचे सांगत महामार्गावर होणारे अपघात तसेच इतर प्रसंगीही पोलिसांच्या मदतीला येथील ग्रामस्थ धावून येतात. संगमेश्वर पोलीस ठाण्यामध्ये आयोजित कार्यक्रमातून ग्रामस्थ आणि पोलिसांचे नाते दृढ होत असल्याचे त्यांनी कौतुक केले.
पोलीस अधीक्षक श्री धनंजय कुलकर्णी यांनी निबंध स्पर्धेमध्ये आणि चित्रकला स्पर्धेमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला. तसेच पोलीस ठाण्यामध्ये लावण्यात आलेल्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पोलीस निरीक्षक अमित यादव, सचिन कामेरकर चंद्रकांत कांबळे आदींसह मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते