मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठा अनर्थ टळला; टायर फुटल्यानंतर प्रवाशांनी भरलेल्या बसने अचानक घेतला पेट; चालकाच्या प्रसंगवधानामुळे सर्व प्रवासी सुखरुप..

Spread the love

पुणे- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज मोठी दुर्घटना टळली आहे. टायर फुटल्याने बसने अचानक पेट घेतला. या बसमध्ये अनेक प्रवासी प्रवास करत होते. मुंबईहून पुण्याच्या दिशेने ही बस निघाली होती. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील आढे गावच्या हद्दीत सकाळच्या सुमारास ही घटना घडली. बसने अचानक पेट घेतल्याने अनेक प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. मात्र चालकाने प्रसंगावधान दाखवत सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवलं. त्यामुळे कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही आहे, सगळे प्रवासी सुखरुप आहेत. आगीवर अग्निशमन दल आणि यंत्रणेने नियंत्रण मिळवले आहे.

मावळमधील आढेगावच्या हद्दीत साडे सातच्या दरम्यान खासगी बसचा टायर फुटला. त्यामुळे बस जागेवरच पेटली. त्यानंतर शॉर्ट सर्किट झाल्यानं संपूर्ण बसने पेट घेतला. या बसमध्ये 36 प्रवासी होते. टायर फुटल्याची माहिती मिळताच बस चालकाने प्रसंगावधान दाखवलं आणि सगळ्या प्रवाशांना बसमधून उतवरून दिलं. चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने सगळे प्रवासी सुखरुप बचावले. आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, वडगाव वाहतूक पोलीस यंत्रणा यांच्या संयुक्त प्रयत्नाने आग विझवली गेली.

बसचा अचानक आग लागल्याने मोठी दुर्घटना झाली असती. अनेक प्रवासी दगावण्याची भीती होती. त्यात सर्व वयोगटातील प्रवाशांचा समावेश होता. मात्र चालकाने प्रसंगावधान दाखवलं आणि मोठा अपघात टळला आहे. साधारण ३६ प्रवासी या बसने प्रवास करत होते. हे सगळे जीव मुठीत घेऊन बस खाली उतरले. त्यानंतर या सगळ्यांनी बर्निंग बसचा थरार अनुभवला. साधारणपणे ही बस पेटल्याने मोठा अपघात टळला. मात्र आम्ही वेळेत बसमधून खाली उतरल्याने आमचा जीव वाचला नाहीतर आज मोठा अनर्थ घडला असला, असा भावना प्रवाशांनी व्यक्त केल्या आहेत. शिवाय ही आग एवढी मोठी होती की साधारणपणे अर्धातास ही आग विझवण्यासाठी लागलेल. त्यातच रस्त्यातच बस पेटल्याने काही वेळ वाहतूक थांबवावी लागली होती आणि त्याचमुळे सकाळीच वाहतूक कोंडी झाली होती. प्रवाशांनी बर्निंंग कारचा थरार अनुभवला.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page