ग्रामपंचायत कारभाराची माहिती क्लिकवर ; ‘मेरी पंचायत’ ॲप…

Spread the love

रत्नागिरी  : डिजिटल युगात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कारभारात पारदर्शकता यावी यासाठी केंद्र सरकारच्या पंचायतराज मंत्रालयाने ‘मेरी पंचायत’ ॲप आणले आहे. या माध्यमातून ग्रामस्थांना आता आपल्या ग्रामपंचायतीचा कारभार कसा सुरू आहे, याची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
     

केंद्र तसेच राज्यशासनाकडून ग्रामपंचायती अधिक बळकट करण्यावर भर दिला जात आहे. विकासात येणारे अडथळे दूर व्हावेत यासाठी थेट ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करून दिला जात आहे. ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता असावी व आपल्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत काय विकास सुरू आहे, कोणत्या योजना आल्या आहेत, शासनाकडून किती निधी मिळाला आदी माहिती उपलब्ध होणार आहे. त्यासाठी केंद्र शासनाने ‘मेरी पंचायत’  हे ॲप तयार केले आहे. स्थानिक पातळीवरील एखाद्या विकासकामाची सूचना फोटोसह सूचित करून प्रशासनाच्या निदर्शनास आणून देता येणार आहे. तसेच काही समस्यांचे फोटो अपलोड करून झालेल्या कामातील चुका किंवा त्या कामाचे कौतुक मांडता येईल. त्यासाठी ग्रामपंचायतीने केलेल्या कामाबाबत ग्रामस्थांना आपला अभिप्राय नोंदवता येणार आहे तसेच ‘मेरी पंचायत’ ॲपच्या माध्यमातून ग्रामपंचायतीचा आर्थिक बाबींचा संपूर्ण लेखाजोखा ग्रामस्थांसमोर येणार आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page