मुंबई गोवा हायवे च्या ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे संगमेश्वर मध्ये फटका , घरामध्ये पाणी जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान..

Spread the love

मकरंद सुर्वे/ संगमेश्वर – आज मुंबई गोवा महामार्ग संगमेश्वर येथील पॉवर हाऊस जवळ असलेल्या मोरी मध्ये हायवेवरील मातीचा भराव टाकल्याने पावसाच्या पाण्यामुळे अक्षरशः पाणी शेजारी दोन घरात घुसले . श्री जयेंद्र दत्ताराम सुर्वे व राजेंद्र अनंत बिर्जे यांच्या घरात पाणी शिरले व त्यांचे खूप नुकसान झाले

त्यांनी संगमेश्वर सरपंच विवेक शेरे यांना बोलावून स्थिती दाखवण्यात आली त्यांनी संबंधित हायवेचा ठेकेदार यांच्याशी संपर्क साधला तरी सुद्धा हायवेच्या ठेकेदारांनी दुर्लक्ष केले म्हणून वरील ग्रामस्थांनी  संगमेश्वर पोलिसांना कळवले आहे. येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे आणि संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. आजपर्यंत अनेक तक्रारी देऊनही कोणती कारवाई करण्यात येत नसल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष वाढत आहे. पालकमंत्र्यांच्या मतदारसंघांमध्ये अशी अवस्था असेल तर सर्वसामान्य माणसांनी काय करायचं हा प्रश्न उपस्थित होत आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page