
निवळी ,रत्नागिरी /दिनेश आंब्रे- मुंबई गोवा हायवे वरती निवळी येते रत्नागिरी मुंबईकडे जाणारा टँकर *NH 01N 4628 आणि चिपळूण वरून रत्नागिरी कडे जाणारी मिनी बस यांच्यामध्ये अपघात झाला असून टँकर अजून वायू गळती चालू असून आग लागल्याचे कळत आहे. आग विझवण्याच्या कामासाठी अग्निशमन दल व पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार अनेक प्रवासी जखमी झाल्याचे समजत आहे. रुग्णवाहिका काही जागेवर दाखल झालेले आहेत. सदरचा अपघात मिळतात दिनेश अमरे यांनी जागेवर जाऊन सदर घटनेची माहिती घेऊन पाठवले आहे. पोलिसांनी मुंबई गोवा हायवे ची वाहतूक मदत कार्य चालू केले आहे.


मुंबई गोवा हायवे बंद वाहनांच्या लांबच लांब रांगा…
मिळालेल्या माहितीनुसार गॅस टँकरच्या धडकेमुळे मिनी बसच्या चालकाचे नियंत्रण सुटून खोलदरीमध्ये बस कोसळली आहे. वायु गळतीमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.


मुंबई गोवा हायवे बंद करण्यात आलेला असून दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. मिनी बस मध्ये किती प्रवासी होते किती जखमी आहे त्याची माहिती सविस्तर मिळालेली नसून ती लवकरच प्रसिद्ध होईल. सविस्तर माहिती लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.