प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे जिल्ह्यात पावणेदोन लाख नोंदणीकृत लाभार्थी…

Spread the love

रत्नागिरी :- केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत एप्रिल ते जुलै या कालावधीतील २० वा हप्ता लाभार्थ्यांना २० जूनला वितरित करण्यात येणार आहे. या योजनेत जिल्ह्यातील १ लाख ७२ हजार ४५७ नोंदणीकृत लाभार्थी असून, त्यामधील ई-केवायसी नसलेले ३ हजार ८८०, बँकखाते आधार संलग्न नसलेले ७ हजार १६९ लाभार्थी प्रलंबित आहेत.


शासनाच्या अग्रीस्टेक योजनेंतर्गत पीएम किसान लाभार्थ्यांसाठी फॉर्मर आयडी तयार करणे आवश्यक असून, आतापर्यंत १ लाख २५ हजार ७४० लाभार्थ्यांनी फॉर्मर आयडी तयार केला आहे. अद्यापही ४६ हजार ७१७ लाभार्थी प्रलंबित आहेत. उर्वरित लाभार्थ्यांनी mhfr.agristack.gov.in या पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी. तसेच सीएससी केंद्र, कृषी विभाग, महसूल वि ग्रामविकास विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत ग्रामस्तरावर नोंदणीचे काम सुरू आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र असलेल्या आणि अग्रीस्टेक योजनेंतर्गत फार्मर आयडी तसेच ई-केवायसी व आधार सीडिंग प्रलंबित असलेल्या सर्व लाभार्थ्यांनी सामायिक सुविधा केंद्राशी संपर्क साधून आपली प्रलंबितता पूर्ण करावी. शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतील हप्ता वेळेवर मिळावा यासाठी ई-केवायसी, आधार सीडिंग व फॉर्मर आयडीची पूर्तता २० जूनपूर्वी व्हावी, असे आवाहन कृषी विभागाकडून केले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page