![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2025/02/1001055830.jpg)
आमदार निलेश राणे यांनी घेतले धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचे आशीर्वाद..
संगमेश्वर- श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरी जिल्हा यांच्यावतीने संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज स्मारक येथे आज मंगळवारी छत्रपती संभाजी महाराजांचा ३४४ वा राज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार निलेश राणे यांनी उपस्थित राहून छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत आशीर्वाद घेतले. तसेच आमदार निलेश राणे यांनी पूजाअर्चा करत राज्याभिषेक दिन पालखी मिरवणुकीत ते सहभागी झाले.
छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या वैचारिक पाऊल खुणांवर चालणारी पिढी समाजात घडावी, समाजामध्ये जागृती व्हावी या एकमेव उद्देशाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक कसबा येथे नित्यपुजन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरीच्या प्रयत्नातून निरंतर सुरू आहे. याच उद्देशाने मंगळवारी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या भव्यदिव्य सोहळ्याला आमदार निलेश राणे यांनी उपस्थित राहून छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला व संभाजी महाराजांचे आशीर्वाद घेतले. या सोहळ्याला श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे रत्नागिरी जिल्हाप्रमुख गणेश गायकवाड, नित्यपूजा समिती प्रमुख सिध्देश चव्हाण, भाजपचे संगमेश्वर तालुकाध्यक्ष रूपेश कदम, राजेंद्र महाडिक, माजी जि. प. अध्यक्ष रोहन बने, भाजपचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अभिजीत शेट्ये, भगवतसिंह चुंडावत आदिंसह श्री शिवशंभूपाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.