![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2025/01/1000997556.jpg)
सकाळी 8-30 वाजता झालेल्या अपघातामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण…
संगमेश्वर /प्रतिनिधी- दुचाकी समोर अचानक बिबट्या आडवा आल्याने झालेल्या अपघातात दुचाकी स्वारासह अन्य एक महिला प्रवासी जखमी झाल्याची घटना आज बुधवारी सकाळी 8.30 च्या सुमारास शास्त्रीपुल आंबेड -डिंगणी मुख्य रस्त्यावर घडली.आज तर चक्क शास्त्रीपुल आंबेड -डिंगणी या नेहमीच वाहनवर्दळीने गजबलेल्या मुख्य रस्त्यावरच वाघाने आंबेड खुर्द येथील मंदार मोहन राहटे वय वर्ष 26 व त्याच्या बरोबर दुचाकी वरून प्रवास करणारी प्राजक्ता संतोष चव्हाण वय वर्ष 26 गाव कोळंबे हे रेल्वे स्टेशन येथे जात असताना आंबेड मुख्य रस्त्यावरून भांडारवाड्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या ठिकाणी अचानक धावत आलेल्या वाघाने त्यांच्या दुचाकीला धडक देत तेथून पुन्हा जंगलच्या दिशेने पळ काढला. सदरच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेले अनेक दिवस बिबट्याचे संगमेश्वर पंचक्रोशी मध्ये मुक्त वावर…
संगमेश्वर परिसरामध्ये लोवले, नावडी, रामपेठ ,कोंड असुर्डे, जांभूळवाडी ,असुर्डे व आजूबाजूच्या पंचक्रोशी मध्ये मुक्त वावर आहे . अनेक वेळा लोकांना वाघाचे दर्शन होत आहे . गेली अनेक दिवस पक्षाच्या शोधासाठी जंगल भाग सोडून गेले काही दिवस संगमेश्वर शहरासह आजूबाजूच्या गावांत मुक्या जनावरांच्या रक्ताला चटावलेल्या बिबट्याची खाद्य शोदार्थ रात्रंदिवस भटकंती सुरु असून. काहींना प्रत्यक्षात बिबट्याचे दर्शन झाल्याचेही बोलले जात आहे. तर भर मानवीवस्ती तसेच शहरीभाग व वाहन वर्दळीच्या च्या ठिकाणी बिबट्या मुक्या जाणवरांची सावज साधण्यासाठी भटकंती करत असल्याचे तसेच सौरव रसाळ यांच्या घरा जवळ येऊन भटक्या कुत्र्यांची पिल्ले पळवून नेत असतानाचे दृश्य कॅमेऱ्यात सुद्धा कैद झाले आहे.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…
गेले अनेक दिवस बिबट्याच्या मुक्त संचार मध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . सोमेश्वर पंचक्रोशी मध्ये तीन चार किलोमीटरचा अंतर असल्यामुळे नागरिक पायी चालत जातात. शाळेतील मुले ,संगमेश्वर बाजारपेठेमध्ये कामासाठी येणारे नागरिक, व बाजारपेठ नावडी मध्ये असल्याने सर्व लोकांचे जीवनमान बाजारपेठेवर अवलंबून असल्याने नागरिक बाजारपेठेमध्ये चालत येतात . गेल्या दोन महिन्याच्या मध्ये दिवसाचे वाघाचे दर्शन होत आहे. अनेक कुत्रे मांजरे यांची शिखर वाघाने केली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकंदरीत येथील वातावरणात बिबट्या ची दहशत एवढी गडद झाली आहे. कोपऱ्या-कोपऱ्यात, नाक्या- नाक्यात चर्चा ऐकायला मिळतेय ती फक्त आणि फक्त बिबट्याचिच. तसेच पहाटे मोर्निंग वॉक साठी बाहेर पडणाऱ्यांच्या मनात सुद्धा भीती निर्माण झाल्याने ते ही बाहेर पडत नाहीयेत. तसेच नेहमी उशिरा पर्यंत गजबजणारे संगमेश्वर बाजारपेठ सुद्धा लवकरच सामसूम होत आहे.
बिबट्याच्या वावरामुळे बाजारपेठ संध्याकाळी शांततेचे वातावरण..
बिबट्याच्या मुक्त व्यवहाराचा बाजारपेठेवरील परिणाम झाला आहे. बाजारात काम करणारे कर्मचारी आजूबाजूच्या पंचक्रोशीतील गावातून येतात त्यामुळे त्यांना वाघाच्या भीतीमुळे लवकर घरी जावे लागते. वाघाच्या दहशतीमुळे लोक बाजारात संध्याकाळची येत नाही. इतर वेळेला 8 / 9 वाजेपर्यंत उडी असणारी बाजारपेठ लवकर बंद झाल्याचे दिसून येते. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने संध्याकाळी लोक घरी राहणेच पसंत करत आहेत.
कोंड आंबेड येतील मंदार रहाटे व प्राजक्ता चव्हाण यांच्या बिबट्याची बाईकला धडक…
आज तर चक्क शास्त्रीपुल संगमेश्वर -आंबेड -डिंगणी या नेहमीच वाहनवर्दळीने गजबलेल्या मुख्य रस्त्यावरच वाघाने आंबेड खुर्द येथील मंदार मोहन राहटे वय वर्ष 26 व त्याच्या बरोबर दुचाकी वरून प्रवास करणारी प्राजक्ता संतोष चव्हाण वय वर्ष 26 गाव कोळंबे हे रेल्वे स्टेशन येथे जात असताना आंबेड मुख्य रस्त्यावरून भांडारवाड्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या ठिकाणी अचानक धावत आलेल्या वाघाने त्यांच्या दुचाकीला धडक देत तेथून पुन्हा जंगलच्या दिशेने पळ काढला.अचानक चालत्या दुचाकी समोर बिबट्या आल्याने या दोघांची बोबडीच वळली आता आपले काय खरे नाही असेच त्यांना वाटले परंतु वाघाने तेथून पळ काढल्याने त्यांनी सुटकेचा श्वास सोडला. मात्र बिबट्या च्या धडकेने दुचाकी रस्त्यावरून काही अंतर घासपट गेल्याने मंदार रहाटे व प्राजक्ता चव्हाण हे दोघेही जखमी झाले असून या दोघांवर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. सुदैवाने वाघाच्या धडकी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
वनविभागाने योग्य ती कारवाई करून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी…
दिवसेंदीवस बिबट्याची दहशत अधिक गडद होत असल्याने या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची तसदी सबंधित वनविभागाने करण्याची मागणी केली जात आहे.
नागरिकांकडून वन विभागाची देवरुख येथे जाऊन भेट घेण्यात आलेले आहे यावेळी नागरिकांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. नागरिकांकडून सह्या घेऊन निवेदन देण्यात येणार आहे . वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आले आहे.
वनविभागाकडून कॅमेरे व गस्त चालू नागरिकांनी जागरूक राहणे आवाहन ….
नावडी परिसरामध्ये वाघाची दहशत व कुत्रे मांजर पळवण्याच्या घटना होत असल्याने नागरिकांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने वनविभाग संगमेश्वर च्या कडून रात्रीच्या वेळी गस्त घालत असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे . नावडी मध्ये परिसरामध्ये कॅमेरे लावले असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे . वाघाचा असलेला वावर व त्याच्यावर नजर ठेवून वाघाचा वावर बघून लवकरच योग्य ती कारवाई करून बंदोबस्त केला जाईल असे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे . नागरिकांनी सावध राहण्याचे सूचना वनविभागाकडून करण्यात आले आहेत .