
मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील रेल्वे रूळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे : मुख्य मार्ग माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लाॅक सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५ वाजेपर्यंत. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते ठाणे अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि यादरम्यान या लोकल सर्व स्थानकात थांबतील.
हार्बर मार्ग सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे मार्गावर आहे. सकाळी ११.१० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशी/नेरूळ/पनवेल, सीएसएमटी ते वांद्रे/गोरेगाव अप आणि डाऊन लोकल सेवा बंद असेल. ब्लॉक कालावधीत पनवेल-कुर्ला दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येतील.
पश्चिम रेल्वे माहीम ते गोरेगाव अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत. ब्लॉक कालावधीत चर्चगेट ते गोरेगाव अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येतील.