उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धक्का; आमदार राजेंद्र शिंगणे यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश…

Spread the love

*मुंबई-* ऐन विधानसभा निवडणुकीत शरद पवारांनी अजित पवारांना मोठा धक्का दिला आहे. सिंदखेडराजाचे अजित पवार गटाचे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. राजेंद्र शिंगणे यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.

यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह पक्षाच्या संसदीय मंडळाचे सदस्य हे देखील उपस्थित होते.
ऐन विधानसभा निवडणुकीत शिंगणे यांनी तुतारी फुंकल्याने अजित पवारांना मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. शिंगणे यांच्या पक्षप्रवेशामुळे सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरण बदलून गेलं आहे. शिंगणे यांच्या पक्षप्रवेशामुळे त्यांची पुतणी गायत्री शिंगणे काय भूमिका घेणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. शरद पवार गटाने शिंगणे यांच्या पक्ष प्रवेशानंतर त्यांना पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

तर पक्षप्रवेशानंतर आमदार राजेंद्र शिंगणे म्हणाले कि, 1992-93 पासून आदरणीय पवार साहेबांबरोबर काम करत आहे. 1995 मध्ये देखील अपक्ष आमदार म्हणून निवडून आल्यानंतर सातत्याने अनेक वर्ष साहेबांबरोबर काम केल्याचे शिंगणे म्हणाले. राजकारण-समाजकारणात केवळ पवारसाहेबांमुळे मोठे होण्याची संधी प्राप्त झाल्याचे शिंगणे म्हणाले. मधल्या काळात मी वर्षभर अजित दादांबरोबर होतो. पण वेळोवेळी मी सांगितलेला आहे की, जिल्हा बँकेच्या अनेक अडचणींमुळं मी अजित पवारांबरोबर होतो. सरकारकडून मदत मला मिळाली नसती तर बँक वाचवणं मला अवघड झालं असतं असेही शिंगणे म्हणाले. म्हणून मी अजित दादांबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. पण आज महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने वाचवण्याची गरज आहे असे शिंगणे म्हणाले. राजकीय सामाजिक दृष्ट्या आणि अनेक इतर विषयांच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राला वाचवण्याची गरज आहे. आदरणीय पवार साहेबच हे काम करू शकतात यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे असेही शिंगणे म्हणाले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page