पुणे- टॅक्स रिर्टन फाइल करून बनावट जीएसटी ई बिल टॅक्स पावत्या बनवून वेगवेगळ्या फर्मला पाठवल्या असल्याचे भासवून एका कंपनीने तब्बल ५६१.६८ काेटींची आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा उघडकीस आला आहे. याप्रकरणी 8 आराेपींवर बंडगार्डन पाेलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जीएसटी अधिकारी रवी भूषणप्रसाद सिंग कुमार (वय-३४) यांनी आराेपी विराेधात फिर्याद दाखल केली आहे.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरचा प्रकार १/१/२०२१ ते ८/१०/२०२४ यादरम्यान वाडिया काॅलेज समाेर डीजीजीआय ऑफिस याठिकाणी घडला आहे. त्यानुसार आराेपी माेहम्मद रियाझउद्दीन, अब्दुल सलाम ऊर्प सलाम भाई, नैशाब मलीक ऊर्फ नाैशादभाई, सलमान मलिक, शादाबभाई, तनवीर, ओविसीस, राजू यादव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आराेपींनी संगनमताने बनावट कंपनीच्या नावाने राजू यादव या आरोपीच्या मार्फत टॅक्स रिर्टन फाईल केल्या. बनावट जीएसटी ई बील टॅक्स पावत्या इलेक्ट्राॅनिक दस्तावेज लॅपटाॅपमध्ये बनवून वेगवेगळ्या फर्मला पाठवून सुमारे सन २०२१ पासून स्पटेंबर २०२४ पर्यंत वितरित करून शासनाची एकूण ५६१.५८ काेटी रुपयांची कर चुकवून आर्थिक फसवणूक केली आहे. याबाबत पुढील तपास पाेलिस उपनिरीक्षक एस खेडकर करत आहेत.
माेबाइल अॅक्सेस घेत १४ लाखांचा गंडा
पुण्यातील कसबा पेठ येथे राहणाऱ्या मंदार शंकर राजाजूरकर (वय-४५) हे त्यांचे राहते घरी असताना त्यांच्या एचडीएफसी कॅश क्रेडीट खात्यातन काेणीतरी अनाेळखी व्यक्तीने त्यांच्या माेबाईलचा अॅक्सेस घेतला. सदर त्यांच्या माेबाईलवरील नेट बँंकिगचा वापर कुन १३ लाख ९५ हजार रुपये परस्पर दुसऱ्या बँक खात्यात पाठवून ते काढून घेत आर्थिक फसवणूक केली आहे. याबाबत फरासखाना पाेलिस पुढील तपास करत आहेत.
अशाचप्रकारे मार्केटयार्ड येथे राहणाऱ्या अजय महेंद्र माेतीवाले (वय-५७) हे राहते घरी असताना त्यांच्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून तक्रारदार यांच्या माेबाईलचा अॅक्सेस प्राप्त करुन खात्यातून तीन लाख ८० हजार रुपये दुसऱ्या बँक खात्यात पाठवून ते काढून घेत आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे