रत्नागिरी : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या विशेष निधीतून रत्नागिरी शहर स्मार्ट सिटी म्हणून विकसित करणे या कामाचा शुभारंभ सोहळा सोमवार दि. 7 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर नाट्यगृहात होणार आहे.
या कार्यक्रमाला खासदार नारायण राणे, सिंधुरत्न योजनेचे विशेष निमंत्रित सदस्य किरण सामंत, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण, अधिक्षक अभियंता कालीदास भांडेकर उपस्थित राहणार आहेत.