रत्नागिरी : पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते कुदळ मारुन आणि कोनशिला अनावरण करुन, खेड उपविभागीय कार्यालयाचे भूमिपूजन आज करण्यात आले.
याप्रसंगी आमदार योगेश कदम, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, प्रांताधिकारी शिवाजी जगताप, प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले, अण्णा कदम, शशिकांत चव्हाण आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, प्रांत कार्यालयासाठी ५ कोटी रुपयाचा निधी दिला आहे. हे कार्यालय सर्वांसाठी महत्वाचे आहे. सर्वसामान्य जनतेला स्वत:च्या घरात गेल्यासारखे या कार्यालयात वातावरण हवे, असे ते म्हणाले.