विकसित भारत संकल्प यात्रा चे संगमेश्वर तालुक्यामध्ये आंबेड बुद्रुक येथे भाजपा महिला मोर्चा सरचिटणीस नपुरामुळे यांनी केले स्वागत..

Spread the love

संगमेश्वर ,आंबेडकर बुद्रुक- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत सरकारच्या जनसामान्यांसाठी असलेल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवून भारत विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सदर भारत विकास यात्रेचे रत्नागिरी मध्ये प्रत्येक ग्रामपंचायत पर्यंत विकासात फिरत आहे. संगमेश्वर मधील आंबेड बुद्रुक ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये भारत विकास यात्रेचा रथ आला होता. यावेळी नागरिकांना भारत सरकार च्या योजनेची माहिती देण्यात आली.

आज विकसित भारत संकल्प यात्रा रथाचे आंबेड ग्रामपंचायत कार्यालयाच्या येथे आगमन झाले. त्यावेळी भाजपा महिला मोर्चा सरचिटणीस या उपस्थित राहून केंद्र सरकारच्या विविध योजनांचे लाभार्थी यांच्याशी संपर्क साधला.


योजना लोकांपर्यंत पोहोचतात की नाही अडचणी असल्यास त्या सोडवण्याच्या आश्वासने यावेळी त्यांनी दिले. यावेळी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हा चिटणीस सौ. सरिता आंबेकर ,
तालुका उपाध्यक्ष संगमेश्वर उत्तर श्री. राजेश आंबेकर, सरपंच श्री. सुहास मायगडे आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

सरपंच सुहास मांगडे यांनी रथाचे स्वागत केले. सर्वसामान्य नागरिकांसाठी मोदी सरकारने योजना राबवल्याबद्दल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धन्यवाद मानले. यावेळी त्यांनी उपस्थित सर्व नागरिक ग्रामपंचायत सदस्य व अधिकारी यांच्या आभार मानले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page