रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्ग आणि रत्नागिरी-नागपूर महामार्गाचे काम सुरू असून, या ठिकाणी ठेकेदाराचे असणारे डंपर, टँकरचालक हे भरधाव व निष्काळजीपणे वाहने चालवत आहेत.मागील तीन महिन्यात अनेक अपघात झाले आहेत. यामध्ये सहाजणांना जीव गमवावा लागला आहे.
मुंबई गोवा हायवे व मिलन नागपूर रस्त्यावरती खड्ड्याचे साम्राज्य प्रशासन निद्रा अवस्थेत…
मुंबई-गोवा महामार्गाचे काम अनेक वर्षे रखडलेले आहे. या रस्त्याच्या कामाचा वेग बऱ्यापैकी वाढला आहे. नागपूर – मिऱ्या महामार्गाचे कामही वेगाने सुरू आहे. ही कामे सुरू असताना रस्त्यांची कटाई, सपाटीकरण त्यावर पाणी मारणे यासाठी टँकरसह डंपर या अवजड गाड्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. या गाड्यांवर काम करणारे चालक हे झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश,कर्नाटक या भागांतून आलेले आहेत. यातील काहींना रस्त्याचा अंदाजही नसल्याने ते माती, डबर किंवा टँकरमध्ये पाणी भरूनही भरधाव गाड्या मारत असतात. आधीच रस्त्याची खोदाई झालेली असल्यामुळे माती व बारीक रेवा यावरून चारचाकी व दुचाकी वाहनधारकांना मोठा त्रास सहन करत गाड्या चालवाव्यात लागत आहेत. त्यातही दुचाकीस्वारांना धोका पत्करावा लागत आहे. या रस्त्यावर दुचाकी घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा मातीच्या रस्त्यावर धुरळा उडू नये, म्हणून पाणी मारले जाते; मात्र खड्ड्यात चिखल होत असून दुचाकीस्वारांना अधिकचा धोका वाढला आहे. मागील तीन महिन्यांत महामार्गाच्या कामामुळे व
डंपर किंवा टँकरचालकांच्या चुकांमुळे सहा जणांना जीव गमवावा लागला आहे.
रस्त्यांच्या कामामुळे अनेक जणांचे मृत्यू…
दोन महिन्यांपूर्वी नाणीज येथे डंपरच्या धडकेत दोघांना जीव
गमवावा लागला होता. दोघेही त्यांच्या घरातील कर्ते पुरुष होते. त्यानंतर हातखंबा तिठा येथे एका तरुणाचा अपघातात मृत्यू झाला होता. टीआरपी येथे झालेल्या टँकर दुचाकी अपघातात दुचाकीवरील दोघांनाही आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर शुक्रवारी रात्री होता. टीआरपी येथे झालेल्या टँकर दुचाकी अपघातात दुचाकीवरील दोघांनाही आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर शुक्रवारी रात्री
टँकरने धडक दिल्यामुळे घरातील कर्त्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातानंतर ठेकेदारांचे चालक मदत करण्याऐवजी पळून जाताना दिसत आहेत. मुळात ठेकेदाराकडे काम असणाऱ्या इंजिनिअर्स, सुपरवायझर यांनी चालकांना योग्य त्या सूचना द्यायला हव्यात; मात्र हे अधिकारीवर्गही अपघातानंतर हात वरती करतात.
जे. एम. म्हात्रे कंट्रक्शन कंपनीच्या गाड्यांच्या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू..
मुंबई गोवा महामार्ग क्रमांक 66 वरील मधील आरवली ते तळेघंटे दरम्यान अनेक अपघात झाले आहेत शास्त्री फुल येथील कोंडआंबेड च्या बाजूला पर्यंत 30 ते 40 अपघात झाले आहेत सदर अपघातामध्ये जीवितहानी झाली नसली तरी गाड्यांचे नुकसान झाले आहे परंतु आजपर्यंत कोणीही कंप्लेंट करत नाही कारण अपघातामध्ये किरकोळ काम निघते व कोर्टाच्या फेऱ्या मारावे लागतात म्हणून कोणीही तक्रार दिलेलं नाही परंतु सोशल मीडिया वरती सदरचे व्हिडिओ आजही उपलब्ध आहेत. मोटरसायकल अपघात होऊन सदर ठिकाणी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. परंतु प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. तसेच संगमेश्वर मधील निधेवाडी येथे रिक्षाचा अपघात होऊन एक माणसाचा मृत्यू झाला आहे. जे. एम. म्हात्रे कंट्रक्शन कंपनीच्या डंपर मुळे कोळंबे येथे एक जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी बाईकला डंपर ने धडक दिल्याने पायावरून डंपर गेला आहे थोडक्यात दोन जणांचे प्राण वाचले आहेत. तसेच निवळी येते झालेल्या अपघातामध्ये सदर कंपनीच्या पाण्याच्या टँकरच्या अपघातामध्ये एका युवकाला जीव गमवावा लागला आहे. एवढे असूनही कोळंबी येथे झालेल्या अपघातातील डंपर सोडून देण्यात आला आहे. दबक्या आवाजामध्ये चर्चेमध्ये कॉन्ट्रॅक्टर सेटलमेंट गुरु असल्याचे बोलले जात आहे. कंपनीचा जीएम हलशेठ सर्व करमत करत असल्याचे निदर्शनास आले आहे व तसे पुरावे ही असल्याचे समजते संबंधित पुरावे लवकरच देवेंद्र फडणीस यांच्याकडे देणार असल्याचे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. सदर विषयांमध्ये मोठा खुलासा होणार असल्याचे बोलले जात आहे.
लेखी तक्रारी देऊनही निर्दयी कॉन्ट्रॅक्टर वर कारवाई नाही…
संबंधित विषयांमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी 15 ऑगस्ट रोजी उपोषण केले होते परंतु दोन दिवसात कारवाई करतो म्हणून कोणतेही कारवाई करण्यात आलेली नाही. आरटीओ कडे लेखी तक्रार देऊनही गाड्यांवर कारवाई करण्यात आलेली नाही. आज 15 ऑगस्ट रोजी दिलेल्या तक्रारी प्रशासनाने दखल घेतली असती तर एवढे प्राण गेले नसते व वेळीच कॉन्टॅक्टर वर कारवाई केली असती तर ही वेळ आली नसती असे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे लवकरच या संदर्भ मध्ये मोठे आंदोलन उभे राहणार असल्याचे बोलले जात आहे. सदर विषयांमध्ये कॉन्ट्रॅक्टरच्या बाजूने पूर्ण प्रशासन उभे राहिले असल्याचे दिसून येत आहे. शासनाने कारवाई करायचं सोडून कॉन्ट्रॅक्टरच्या बाजूने उभे राहणे यावरून महत्त्वाचे धागे समोर येण्याचे चिन्ह आहे. कॉन्ट्रॅक्टर चे काम निकृष्ट दर्जाचे असूनही कॉन्ट्रॅक्टरला तीन मोठी काम मिळाल्याचे समस्या आहे.