☯️सूर्यावर मोठा धमाका, भयंकर सौर वादळ पृथ्वीच्या दिशेन , आज अलर्ट राहा! नासाचा इशारा

Spread the love

⏩नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून सूर्याच्या पृष्ठभागावर सतत जोरदार हालचाली होत असल्याचं समोर आलं आहे. कधीकधी सूर्याच्या पृष्ठभागावर प्रचंड स्फोट देखील होत आहेत. ज्याचा प्रभाव थेट पृथ्वीवर होत असून या सूर्याच्या पृष्ठभागावरील स्फोटांमुळे पृथ्वीवर सौर वादळ होताना दिसत आहे. त्यांना भूचुंबकीय वादळ असंही म्हणतात. दरम्यान नासाने देखील सूर्याच्या पृष्ठभागावर एक मोठा स्फोट पाहिला असून ज्याचा प्रभाव आता पृथ्वीवर दिसणार आहे. तर या आपत्तीमुळे पृथ्वीवरील कोणत्या गोष्टीचं नुकसान होईल हे सारं नेमकं काय आहे जाणून घेऊ…
नासाच्या सोलर डायनॅमिक्स ऑब्झर्व्हेटरीने सूर्याच्या एका फिलामेंट म्हणजेच तंतूमध्ये मोठा धमाका होण्याचा इशारा दिला होता. दरम्यान स्पेसवेदरच्या रिपोर्टनुसार, हा स्फोट २१ एप्रिल रोजी झाला होता. या स्फोटामुळे कोरोनल मास इंजेक्शन (CME) होतो. ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे सूर्याच्या पृष्ठभागावर भूचुंबकीय वादळ म्हणजेच सौरवादळ उद्भवते आणि कधीकधी पृथ्वीच्या दिशेने देखील जातं. जर त्या वेळी पृथ्वीची दिशा त्याच्या दिशेने असेल तर त्याला स्ट्राइकिंग झोन म्हणतात. कोरोनल मास इजेक्शनचा हा प्रचंड ढग आता पृथ्वीकडे वळला आहे, ज्याचा प्रभाव येथे आज-उद्यामध्ये (२४-२५ एप्रिल) रोजी दिसून येईल.

काय नुकसान होऊ शकतं?

तर सौर वादळ हे त्याच्या आकारानुसार वर्गीकृत केलं जातं. हे G1 ते G5 पर्यंत वर्गीकृत आहेत. G5 श्रेणीतील सौर वादळ सर्वात शक्तिशाली मानले जाते. त्याच्या धडकेमुळे पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. हे पृथ्वीवरील अनेक प्रकारची उपकरणे खराब करू शकतात, दळणवळणाच्या साधनांमध्ये बिघाड निर्माण करू शकतात. त्यामुळे वीजपुरवठ्यावरही परिणाम होऊ शकतो. त्याचा रेडिओ, उपग्रह आणि नेव्हिगेशन सिस्टमवरही परिणाम होऊ शकतो.
२४ एप्रिल रोजी पृथ्वीवर धडकणाऱ्या भूचुंबकीय वादळाचे वर्णन G1 ते G2 श्रेणी असे करण्यात आले आहे. श्रेणीनुसार यातून फारसा धोका सांगितला नाही, पण पृथ्वीच्या जवळ पोहोचल्यावर त्याचा काय परिणाम होईल, हे त्याच्या टक्करानंतरच कळेल. अंतराळ शास्त्रज्ञांच्या मते, यावेळी सूर्य त्याच्या ११ वर्षांच्या सौर चक्रातून जात आहे. दर ११ वर्षांनी, सूर्याच्या पृष्ठभागावर अशा क्रियाकलाप खूप वेगवान होतात.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page